TRENDING:

Toxic Cough Syrups: देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा धक्का, ऑल इंडिया झाडाझडती सुरू; राज्यांना आदेश- सर्वांची यादी द्या

Last Updated:

Cough Syrup: दूषित खोकल्याच्या सिरप प्रकरणी भारत सरकार मोठ्या हालचालीत उतरलं आहे. CDSCO देशभरातील सर्व सिरप उत्पादकांचे ऑडिट करून औषधांची गुणवत्ता आणि सुरक्षितता निश्चित करणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली: दूषित खोकल्याच्या सिरपच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय चौकशीच्या पार्श्वभूमीवर भारताचा सर्वोच्च औषध नियंत्रक प्राधिकरण सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)ने देशभरातील सर्व खोकल्याच्या सिरप उत्पादकांची संपूर्ण तपासणी (ऑडिट) करण्याच्या तयारीत आहे. जेणेकरून उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करता येईल, अशी माहिती News18 ने दिली आहे.

advertisement

CDSCOच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने News18 ला सांगितले की- सर्व राज्यांकडून आणि केंद्रशासित प्रदेशांकडून खोकल्याच्या सिरपचे सर्व उत्पादकांची संपूर्ण यादी मागवण्यात आली आहे आणि यासाठी नियमित तपासणी आणि देखरेखीसाठी एक सक्षम आणि सुस्थित प्रणाली उभारली जात आहे.

advertisement

त्या अधिकाऱ्यांनी सांगितले, आम्ही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून खोकल्याच्या सिरप उत्पादकांची यादी मागवली आहे. आम्ही संपूर्ण देशभरातील सर्व उत्पादकांचे ऑडिट सुरू करणार आहोत. यासाठी आम्ही एक सशक्त आणि योग्य प्रणाली तयार करत आहोत. याबाबतचे अधिकृत जाहीर वक्तव्य पुढील दहा दिवसांत केले जाईल.

advertisement

DEG आढळल्याने पुन्हा वाढली चिंता

ही कारवाई मध्य प्रदेश आणि तामिळनाडू येथे घेतलेल्या नमुन्यांमध्ये विषारी ‘डायइथिलीन ग्लायकॉल’ (DEG) आढळल्यानंतर सुरू झाली आहे. या घटनेने भारतीय औषध उद्योगावरील आंतरराष्ट्रीय अविश्वास पुन्हा वाढवला आहे.

CDSCOच्या सूत्रांच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशात केंद्रीय आणि राज्य औषध अधिकाऱ्यांनी संयुक्त तपासणी केली. ज्यात एकूण 19 सिरप नमुन्यांपैकी 3 नमुने DEG चाचणीत अपयशी ठरले. Respifresh, Relife आणि Coldrif या सिरपमध्ये DEG आढळले,” असे सूत्रांनी सांगितले. आम्ही नमुने आपापसात विभागून घेतले. आमच्याकडील सहा नमुने DEGमुक्त निघाले. पण त्याच दिवशी तामिळनाडू FDAला DEG सापडले आणि नंतर मध्य प्रदेश FDAलाही त्याच बॅचमध्ये DEG आढळले.

advertisement

या निष्कर्षांनंतर अनेक उत्पादकांविरुद्ध कारवाई सुरू झाली असून त्यात Sresan Pharma या कंपनीवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत झाले आहे.

Sresan Pharma मध्ये 364 उल्लंघनं, 38 गंभीर निरीक्षणं

अधिकाऱ्यांनी सांगितले की- Sresan Pharmaला परवाना 2011 मध्ये राज्य औषध नियंत्रकाने दिला होता आणि 2016 मध्ये नूतनीकरण केले. मात्र CDSCOचा या प्रक्रियेत काहीही सहभाग नव्हता. हा परवाना राज्य नियामकांनी 2011 मध्ये दिला. CDSCOने तो परवाना किंवा नूतनीकरण दिलेले नाही. आम्हाला या कंपनीच्या अस्तित्वाचीही कल्पना नव्हती. आमच्या तपासणीत आम्ही 364 उल्लंघनं शोधली. त्यापैकी 38 गंभीर स्वरूपाची होती. एवढ्या प्रमाणात उल्लंघनं आम्ही यापूर्वी कधीच पाहिली नव्हती, असे अधिकाऱ्याने सांगितले.

या निष्कर्षांनंतर CDSCOने तामिळनाडू FDAला Sresan Pharmaचा परवाना रद्द करण्याची आणि फौजदारी कारवाई सुरू करण्याची शिफारस केली आहे.

राजस्थानातील मृत्यू सिरपशी संबंधित नाहीत

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, राजस्थानमध्ये अलीकडे नोंदवलेले मृत्यू खोकल्याच्या सिरपमुळे झालेले नाहीत. आम्ही खोकल्याच्या सिरपचे आणि इतर औषधांचे नमुने तपासले, परंतु DEG आढळले नाही. डेक्स्ट्रोमेथॉर्फन सिरप जबाबदार असल्याची चर्चा होती, पण हे सर्व प्रकरणे तीव्र श्वसन विकार आणि एन्सेफॅलायटिसशी संबंधित होती, असे सूत्रांनी सांगितले. डेक्स्ट्रोमेथॉर्फन-आधारित सिरपसाठी सॉल्व्हंटची गरजच नसते, त्यामुळे DEGचा वापर होण्याची शक्यता नाही. तरीदेखील आम्ही सर्व सिरप DEGसाठी तपासले.

गुजरातमधील दोन उत्पादकांनी उत्पादन थांबवले

दरम्यान गुजरातमधील दोन खोकल्याच्या सिरप उत्पादकांनी CDSCOच्या शिफारशीवरून त्यांच्या राज्य औषध प्राधिकरणांच्या निर्देशानंतर उत्पादन तात्पुरते थांबवले आहे.

राज्यांची भूमिका आणि केंद्राचे मर्यादित अधिकार

CDSCOच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की- भारतातील औषध नियंत्रण प्रणाली संघराज्यीय रचनेवर आधारित आहे, जिथे आरोग्य हा राज्यांचा विषय आहे. ही संघराज्यीय व्यवस्था आहे. आरोग्य हा राज्य विषय आहे. आम्ही केवळ शिफारस करू शकतो, पण राज्य नियामकांनी योग्य पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय औषध उद्योगासाठी मोठी स्वच्छता मोहीम

जागतिक स्तरावर भारताच्या औषध उत्पादनांवर वाढत्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील खोकल्याच्या सिरप उत्पादकांचे हे सर्वात व्यापक आणि कठोर ऑडिट ठरणार आहे. या मोहिमेद्वारे भारताचा अब्जावधी डॉलरचा औषध उद्योग अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले जात आहे. जे आगामी काळात भारतीय औषध उद्योगाच्या विश्वसनीयतेसाठी निर्णायक ठरू शकते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीला घरीच बनवा खमंग आणि खुसखुशीत शेव, या टिप्सने बनणार नाही तेलकट, Video
सर्व पहा

मराठी बातम्या/देश/
Toxic Cough Syrups: देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा धक्का, ऑल इंडिया झाडाझडती सुरू; राज्यांना आदेश- सर्वांची यादी द्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल