12 मार्च रोजी हरियाणातील सोनीपत इथं हा लग्नसोहळा होणार आहे. नवरा संदीप हरयाणाचा तर नवरी अनुराधा राजस्थानची. सुमारे चार वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर हे कपल विवाहबंधनात अडकणार आहे.
हे कपल साधासुधं नाही, नवरानवरी दोघंही गुंड आहेत. अनुराधा चौधरी उर्फ 'मॅडम मिंज' राजस्थानची गँगँगस्टर तर संदीप उर्फ काला जथेडी हरियाणाचा गँगस्टर.
लग्नादिवशीच नवरीच्या रूममध्ये जाऊन नवरदेवाचं अजब कांड; तरुणीने लग्नास दिला नकार, मग...
advertisement
अनुराधाला तिचा पहिला पती दीपक मिंज यांच्यापासून 'मिंज' हे आडनाव मिळालं, ज्याच्याशी तिनं 2007 मध्ये लग्न केलं, परंतु 2013 मध्ये ती वेगळी झाली. बँकिंग व्यवसायात येण्यापूर्वी अनुराधाने एमबीएचे शिक्षण घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
2017 मध्ये राजस्थानच्या चुरू येथे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला गँगस्टर आनंदपाल सिंगची जवळची सहकारी अनुराधा जिच्यावर राजस्थान आणि दिल्लीत मनी लॉन्ड्रिंग, अपहरण, धमकी आणि शस्त्रास्त्र कायद्याशी संबंधित अर्धा डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत.
सोनीपतच्या जथेडी गावात राहणारा संदीप हा हरियाणातील सोनीपत येथील आयटीआयचा विद्यार्थी होता. मे 2021 मध्ये दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटू सागर धनखरच्या हत्येनंतर संदीपचे नाव चर्चेत होते. याप्रकरणी धनखरच्या हत्येप्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमारला अटक करण्यात आली होती. अधिकाऱ्याने सांगितले की, संदीप हा धनखरचा जवळचा सहकारी मानला जातो.
संदीप हा तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी आहे. दिल्ली पोलिसांच्या नोंदीनुसार, संदीपवर हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत.
रात्री शौचासाठी घराबाहेर पडली नववधू; रात्रभर परतलीच नाही, सकाळी नवरदेवाची सासऱ्याकडे अजब मागणी
एका अधिकाऱ्याने सांगितले की, अनुराधा आणि संदीप या दोघांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने 30 जुलै 2021 रोजी यमुनानगर-सहारनपूर महामार्गावरील एका ढाब्याजवळ अटक केली होती. त्यावेळी ते एकत्र राहत होते. अधिकाऱ्याने सांसांगितं की, त्यावेळी राजस्थान पोलिसांनी अनुराधावर 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, तर संदीपच्या अटकेवर 7 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
2020 मध्ये प्रेमकहाणी सुरू झाली
एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोघांची प्रेमकहाणी 2020 मध्ये सुरू झाली, जेव्हा अनुराधा मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये संदीपला भेटली होती. संदीपच्या कागदपत्रांनुसार, त्याने अनुराधाशी मंदिरात लग्न केले आणि ते दोघे इंदूरमध्ये काही महिने भाड्याच्या घरात राहत होते. मार्च 2021 मध्ये दोघेही बिहारला गेले आणि काही महिने तिथे राहिले. जजूनमध्ये ते बिहार सोडून उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊला गेले. पुढे ते महाराष्ट्रातील शिर्डी आणि उत्तर प्रदेशातील मथुरा येथे गेले. अनुराधाच्या दस्तऐवजात नमूद केल्याप्रमाणे दिल्ली पोलिसांनी अटक करण्यापूर्वी त्यांनी उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये काही दिवस घालवले.
लग्नासाठी केवळ सहा तासांसाठी संदीप तुरुंगातून जामिनावर बाहेर येणार आहे. न्यायालयाने संदीपला लग्नासाठी पॅरोल दिला आहे. अनुराधा आधीच जामिनावर आहेत. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्हाला कळले की अनुराधा सोनीपतमध्ये संदीपच्या पालकांची काळजी घेत आहे.' त्यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर 'व्हायरल' झाली आहे.