ऑपरेशन 'बुनयान अल-मारसूस'चा फियास्को
पाकिस्तानने 10 मे रोजी रात्री 1 वाजता 'ऑपरेशन बुनयान अल-मारसूस' सुरू केले होते आणि पुढील 48 तासांत भारतीय हवाई तळांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती. परंतु सकाळी 9:30 पर्यंत हे ऑपरेशन अपयशी ठरले. भारताने त्याच रात्री चार जोरदार हवाई हल्ले केले. ज्याने पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांना (Military Infrastructure) पूर्णपणे उद्ध्वस्त केले.
advertisement
बुडालेल्या जहाजातून समुद्रात मिसळले विष, फक्त स्पर्शाने होऊ शकतो मृत्यू
संघर्षाचे कारण आणि 'ऑपरेशन सिंदूर'
हा संघर्ष भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' मुळे सुरू झाला. जो 7 मे रोजी सुरू करण्यात आला होता. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला हे ऑपरेशन प्रत्युत्तर होते. भारताने पाकिस्तानवर सीमापार दहशतवादाला समर्थन दिल्याचा आरोप केला होता.
भारताचा महाभयंकर पलटवार, नूर खान एअरबेसची राखरांगोळी; गुप्त छायाचित्रे जगासमोर
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीर (POK) मधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. संरक्षण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यांमध्ये 170 हून अधिक दहशतवादी आणि 42 पाकिस्तानी लष्करी कर्मचारी मारले गेले.
भारताचे सडेतोड हल्ले आणि पाकिस्तानचे मोठे नुकसान
10 मे रोजी भारतीय हवाई दलाने (IAF) पाकिस्तानच्या महत्त्वाच्या हवाई तळांवर अचूक हल्ले केले. ज्यात चकलाला येथील नूर खान (Noor Khan), जॅकबाबाद (Jacobabad) आणि भोलारी (Bholari) यांचा समावेश होता. मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, पहिल्या हल्ल्यात राफेलमधून (Rafale) डागलेल्या SCALP आणि SU-30 MKI मधून (SU-30 MKI) लॉन्च केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी (BrahMos Missiles) नूर खानच्या उत्तरी कमांड-अँड-कंट्रोल सेंटरला (Northern Command-and-Control Center) नष्ट केले.
पहाटे 3 वाजता कुटुंबासमोर गोळ्या घालून हत्या; गप्प राहिले, तर आणखी रक्तपात होईल
जेव्हा आयएएफने जॅकबाबाद आणि भोलारी हवाई तळांवर शेवटचे हल्ले केले. तोपर्यंत पाकिस्तानने माघार घेतली होती आणि अमेरिकेकडून युद्धविरामाची मागणी करत होता.
S-400 सिस्टिमची महत्त्वपूर्ण भूमिका
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान आदमपूरमध्ये तैनात असलेल्या भारताच्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीने (Air Defense System) महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या प्रणालीने 11 वेळा हल्ले रोखले. तसेच पाकिस्तानच्या एका SAAB-2000 एअरबोर्न अर्ली वॉर्निंग सिस्टमला (AWACS) पाकिस्तानी हद्दीत 315 किलोमीटर आत पाडले.
हिंदुस्तान टाइम्सच्या सूत्रांनुसार भारतीय हवाई दलाकडे एक C-130J विमान, एक JF-17, आणि दोन F-16 विमाने (जी हवेत आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी होती) पाडल्याचे पुरावे आहेत. भारताने चीनच्या HQ-9 आणि LY-80 हवाई संरक्षण प्रणालींनाही नष्ट केले.
10 मे रोजी भारतीय नौदलाची (Indian Navy) जहाजे मकरान (Makran) किनारपट्टीपासून 260 मैल दूर तैनात होती. पाकिस्तानच्या डीजीएमओने (DGMO) ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या वापराबाबत प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली होती. परंतु भारताने ही धमकी दुर्लक्षित केली. दुपारपर्यंत पाकिस्तानच्या डीजीएमओने 'नो-फायर' (No-Fire) कराराची मागणी सुरू केली.