बुडालेल्या जहाजातून समुद्रात मिसळले विष, फक्त स्पर्शाने होऊ शकतो मृत्यू; किनाऱ्यावर रासायनिक नरसंहार भीती

Last Updated:

Kerala Cargo Ship: कोचीजवळ 640 कंटेनर घेऊन जाणारे लायबेरियाई मालवाहू जहाज समुद्रात उलटून बुडाले आहे. या घटनेमुळे समुद्रातील जीवसृष्टी आणि पर्यावरणावर गंभीर रासायनिक परिणामांची भीती निर्माण झाली आहे.

News18
News18
कोची: केरळमधील कोचीजवळ समुद्रात 640 कंटेनर घेऊन जाणारे लायबेरियाई मालवाहू जहाज उलटून बुडाले आहे. ज्यामुळे पर्यावरणाला मोठे नुकसान पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय तटरक्षक दलाने रविवारी (25 मे 2025) दिलेल्या निवेदनानुसार, 25 मे रोजी सकाळी एमएससी ईएलएसए 3 (MSC ELSA 3) जहाज वेगाने कलंडले आणि पलटून बुडाले. जहाजावरील उर्वरित तीन क्रू सदस्यांनी समुद्रात उडी मारली. ज्यांना भारतीय नौदलाच्या 'आयएनएस सुजाता' (INS Sujata) या जहाजाने सुरक्षित बाहेर काढले.
प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना
भारतीय तटरक्षक दलाने सांगितले की, तेल गळतीसारख्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित तोंड देण्यासाठी प्रदूषण नियंत्रण उपकरणांनी सुसज्ज असलेले 'सक्षम' (Sakam) जहाज घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. जहाजावर असलेल्या 640 कंटेनरपैकी 13 मध्ये रासायनिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री होती. तर 12 कंटेनर कॅल्शियम कार्बाइडने भरलेले होते. तटरक्षक दलाने पुढे सांगितले की, जहाजाच्या टाक्यांमध्ये 84.44 मेट्रिक टन डिझेल आणि 367.1 मेट्रिक टन फर्नेस ऑइल (Furnace Oil) होते.
advertisement
भारताचा महाभयंकर पलटवार, नूर खान एअरबेसची राखरांगोळी; गुप्त छायाचित्रे जगासमोर
केरळचा संवेदनशील किनारी प्रदेश हा वैविध्यपूर्ण जैवविविधतेचा आश्रयस्थान तसेच एक प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने तटरक्षक दलाने सर्व संभाव्य परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी प्रदूषण नियंत्रणाची तयारी तीव्र केली आहे आणि राज्य प्रशासनाशी समन्वय साधला आहे.
कॅल्शियम कार्बाइड किती धोकादायक आहे?
कार्गो शिपमध्ये 12 कंटेनर कॅल्शियम कार्बाइडचे असल्याचे निश्चित झाले आहे. जर हे रसायन समुद्रात मिसळले तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
advertisement
पाण्यातील प्राण्यांवर परिणाम:
पाण्याची रासायनिक रचना बिघडते: कॅल्शियम कार्बाइड पाण्यात विरघळल्यावर कॅल्शियम हायड्रॉक्साइड (Calcium Hydroxide) तयार होते. ज्यामुळे पाणी अत्यंत अल्कधर्मी (alkaline) बनते. बहुतेक जलचर मर्यादित pH स्तरावरच जगू शकतात आणि या असंतुलनामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.
advertisement
एसिटिलीन वायूचा प्रभाव: पाण्यातून निघणारे बुडबुडे आणि वायू पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा कमी करतात. ज्यामुळे मासे आणि इतर जीवांचा श्वास गुदमरू शकतो आणि त्यांचा मृत्यू होऊ शकतो.
त्वचा आणि गलफड्यांना नुकसान: मासे आणि उभयचर (जे पाणी आणि जमीन दोन्हीवर जगतात) जीवांच्या त्वचा आणि गलफड्यांवर हे रसायन संक्षारक (corrosive) परिणाम करते.
प्रजनन आणि जैविक चक्रात बाधा: पाण्यातील रसायनांच्या उपस्थितीमुळे जलचरांची प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. ज्यामुळे संपूर्ण प्रजातींवर परिणाम होऊ शकतो.
advertisement
मनुष्यांवर काय परिणाम होऊ शकतो?
आरोग्यावर थेट परिणाम (विशेषतः दूषित पाणी प्यायल्यास किंवा संपर्कात आल्यास):
-त्वचेवर जळजळ, ॲलर्जी किंवा पुरळ.
-डोळ्यांना जळजळ किंवा नुकसान.
-दूषित पाण्याचे सेवन केल्यास पोटदुखी, उलटी, जुलाब.
-दीर्घकाळ वायूंच्या संपर्कात राहिल्यास फुफ्फुसे आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
फळांमध्ये वापरल्याने अप्रत्यक्ष परिणाम:
जर कॅल्शियम कार्बाइड वापरून पिकवलेली फळे खाल्ली गेली, तर त्यातील आर्सेनिक (Arsenic) आणि फॉस्फीन वायू (Phosphine Gas) शरीरात जाऊन डोकेदुखी, मानसिक विकार, किडनी आणि यकृतावर परिणाम, आणि अगदी कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.
advertisement
'कोणत्याही कंटेनर किंवा तेल गळतीला स्पर्श करू नका'
तटरक्षक दलाने सांगितले की, "तटरक्षक दलाच्या विमानाद्वारे तेल गळती ओळखणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने परिस्थितीचे मूल्यांकन केले जात आहे. सध्या कोणत्याही प्रकारच्या तेल गळतीची पुष्टी झालेली नाही. उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहेत आणि एमएससी ईएलएसए-3 बुडाल्यानंतर होणाऱ्या पर्यावरणीय परिणामांवर सतत लक्ष ठेवून आहेत. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (Kerala State Disaster Management Authority - KSDMA) लोकांना आवाहन केले आहे की, समुद्राच्या किनाऱ्यावर येऊ शकणाऱ्या कोणत्याही कंटेनर किंवा तेल गळतीला स्पर्श करू नये. एमएससी ईएलएसए-3 हे जहाज शुक्रवारी विझिगम बंदरातून कोचीसाठी रवाना झाले होते.
advertisement
केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (KSDMA) दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर आणि तेल तसेच इतर रासायनिक पदार्थ किनाऱ्यावर वाहून येण्याची शक्यता आहे. किनाऱ्याच्या काही भागांमध्ये तेलाचे थर दिसू शकतात. तटरक्षक दलाने पुष्टी केली आहे की, जहाजात मरीन गॅस ऑइल (Marine Gas Oil - MGO) आणि अति कमी सल्फर इंधन तेल (Very Low Sulphur Fuel Oil - VLSFO) होते.
शनिवारी (24 मे) केरळच्या किनारपट्टीपासून सुमारे 38 सागरी मैल (nautical miles) दूर लायबेरियाई कंटेनर जहाज सुमारे अनेक अंशांनी झुकले होते. ज्यामुळे त्यातील काही कंटेनर समुद्रात पडले होते.
कार्गो शिपवर 24 लोक होते. शनिवार (24 मे) रोजी दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी जहाजाच्या मालकी कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांना माहिती दिली की, त्यांचे जहाज 26 अंशांपर्यंत झुकले आहे आणि त्वरित मदतीची आवश्यकता आहे. भारतीय तटरक्षक दलाने मदत आणि बचाव कार्याचे समन्वय साधले आणि संकटग्रस्त जहाजाजवळ आपली जहाजे आणि विमाने तैनात केली. जहाजाच्या 24 सदस्यीय क्रूमध्ये एक रशियन (कॅप्टन), 20 फिलिपिनी, दोन युक्रेनियन आणि एक जॉर्जियन नागरिक यांचा समावेश होता.
मराठी बातम्या/Viral/
बुडालेल्या जहाजातून समुद्रात मिसळले विष, फक्त स्पर्शाने होऊ शकतो मृत्यू; किनाऱ्यावर रासायनिक नरसंहार भीती
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement