TRENDING:

इंग्रजीमधून भाषण, राष्ट्रपतींची भेट आणि राजदूतांची बैठक; मोदी सरकार काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत?

Last Updated:

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकार मोठे पाऊल उचलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज गुरुवारी पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये इंग्रजीत भाषण केले. दुसऱ्या बाजूला गृहमंत्र्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि परराष्ट्र मंत्रालयाने २०हून अधिक देशांच्या राजदूतांची बैठक घेऊन हल्ल्याबाबत माहिती दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला यावेळी भारताने वेगळ्या पद्धतीने धडा देण्याचे ठरवल्याचे दिसते. काल मोदी सरकारने सिंधू पाणी करार स्थगित केला, त्याच बरोबर अन्य काही महत्त्वाचे निर्णय घेतले. आता आज गुरुवारी भारताने आणखी 3 महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
News18
News18
advertisement

20 देशांना दिला निरोप, मोठी कारवाई करणार...

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं पाऊल उचललं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) जर्मनी, जपान, पोलंड, ब्रिटन, रशिया यांसारख्या प्रमुख राष्ट्रांसह २० पेक्षा अधिक देशांच्या राजदूतांना विशेष माहिती सत्रासाठी दक्षिण ब्लॉक येथील कार्यालयात पाचारण केलं. या बैठकीत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दहशतवादी हल्ल्याविषयी सविस्तर माहिती दिली. ज्यामध्ये हल्ल्याचे स्वरूप, त्याची अमानुषता आणि त्यामागे असलेल्या शक्तींची माहिती समाविष्ट होती.

advertisement

एअर स्ट्राइकच्या भीतीने पाकिस्तान बिथरला, इस्लामाबादने भीतीने घेतले 8 निर्णय

हल्ल्याच्या निषेधार्थ आणि भारताच्या सुरक्षाविषयक भूमिकेला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळावा. यासाठी हे विशेष माहिती सत्र आयोजित करण्यात आले. भारताच्या भूमिकेचा आंतरराष्ट्रीय समुदायावर परिणाम होईल याकडेही लक्ष केंद्रित करण्यात आलं. या हल्ल्यात 26 जणांचा बळी गेला असून त्यात बहुतांश पर्यटक होते. भारताने या घटनेला सुनियोजित आणि अमानवी कृत्य ठरवत जागतिक पातळीवर कारवाईसाठी दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

advertisement

गृहमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री पोहोचले राष्ट्रपती भवनात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांना मंगळवारी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली. ही भेट केंद्र सरकारकडून पुढील काही दिवसात काय निर्णय घेतले जातील याची माहिती घेण्यासाठी शहा आणि जयशंकर यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याचे मानले जात आहे.

advertisement

भारताचं युद्धजन्य पाऊल, जगाच्या नजरा दिल्लीकडे; समुद्रातून 'सर्जिकल' इशारा

बिहारमध्ये इंग्रजीत भाषण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत प्रथमच थेट प्रतिक्रिया व्यक्त करताना केवळ देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला गंभीर संदेश दिला आहे. सामान्यपणे हिंदीत भाषण करणारे पंतप्रधान मोदी जेव्हा हिंदी भाषिक बिहारमधील मधुबनी येथे भाषणादरम्यान अचानक इंग्रजीत बोलू लागले. मोदींचे हे भाषण संपूर्ण जगासाठी होते.

advertisement

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणाच्या इंग्रजी भागातून थेट जगाला संबोधित करताना म्हटले की, "भारत दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंत शोधून काढेल आणि त्यांना अशी शिक्षा देईल, ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल." त्यांचा हा अत्यंत कठोर पवित्रा आणि भाषेतील बदल, भारत या प्रकरणात मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचे दर्शवतो. मोदींनी त्यांचा हा संदेश इंग्रजीत दिला, जेणेकरून भारताचा इशारा संपूर्ण जगाला अधिक स्पष्टपणे ऐकू आणि समजू शकेल.

पंतप्रधान मोदींनी नेहमीच आंतरराष्ट्रीय मंचांवरही हिंदीचा वापर केला आहे. त्यामुळे बिहारच्या हिंदी भाषिक भागात मधुबनी येथे त्यांनी अचानक इंग्रजीत बोलणे सर्वांना आश्चर्यचकित करणारे होते. पण हा बदल विचारपूर्वक उचललेले पाऊल होते. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणाच्या मध्यात इंग्रजीत बोलताना म्हटले, "Today from the soil of Bihar I say to the whole world - India will identify, track and punish every terrorist and their backers. We will pursue them to the ends of the earth."

पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्याला केवळ एक हिंसक घटना नव्हे, तर भारताच्या आत्म्यावरचा हल्ला असल्याचे सांगताना इंग्रजीत असेही म्हटले, "India’s spirit will never be broken by terrorism. Terrorism will not go unpunished."

आंतरराष्ट्रीय समुदायाला संदेश

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

पंतप्रधान मोदींनी यानंतर भारताला पाठिंबा देणाऱ्या देशांना संबोधित करताना म्हटले, "Everyone who believes in humanity is with us. I thank people and leaders of countries who have stood with us." अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या भाषणातून हे देखील स्पष्ट केले की, भारत या लढ्यात एकटा नाही.तर माणुसकीवर विश्वास ठेवणारे सर्व देश आमच्यासोबत उभे आहेत.

मराठी बातम्या/देश/
इंग्रजीमधून भाषण, राष्ट्रपतींची भेट आणि राजदूतांची बैठक; मोदी सरकार काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल