भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI)ने चालू आर्थिक वर्षात तब्बल ५६ हजार कोटी रुपयांचे कर्ज मुदतीच्या आधी फेडले आहे. गडकरींच्या या निर्णयामुळे NHAIचे जवळ जवळ १ हजार २०० कोटी रुपये वाचले आहेत. ही रक्कम व्याज म्हणून द्यावी लागणार होती. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
तुमच्या कुटुंबात अशी कोणतीही घटना होऊ नये;नितीन गडकरी पोटतिडकीने म्हणाले
advertisement
चालू आर्थिक वर्षात NHAIवर एकूण कर्ज ३.३५ लाख कोटी इतके होते. २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस ते कमी होऊन फक्त २.७६ लाख कोटी इतके शिल्लक आहे. NHAIवरील कर्जाचे ओझे कमी करण्यात यश आले आहे.
प्रीपे म्हणजे काय? आणि त्याचा फायदा काय?
कर्ज प्रीपे करणे म्हणजे तुम्ही घेतलेले कर्ज त्याच्या मुदतीच्या आधीच देणे होय.उदाहरणासाठी घर खरेदी करण्यासाठी २० वर्षाच्या मुदतीसाठी कर्ज घेतले असेल आणि ते कर्ज जर १० वर्षातच फेडले तर त्याला प्रीपेमेंट म्हटले जाते. त्याचा सर्वात मोठा फायदा हा की तुम्हाला व्याज म्हणून द्यावी लागणारी एक मोठी रक्कम द्यावी लागत नाही.
शरिराच्या आत लपवले 12 कोटींचे कॅप्सूल, डॉक्टरांनी बाहेर काढले
देशातील राष्ट्रीय मार्गांचा विकास, त्याची देखभाल आणि अन्य गोष्टींची जबाबदारी NHAIकडे आहे. त्याची निर्मिती १९८८ साली करण्यात आली होती. NHAI स्वायत्त असली तरी ते रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येते. कर्ज लवकर दिल्याने NHAIची आर्थिक स्थिती अधिक चांगली होईल. कर्ज कमी झाल्याने व्याजासाठी द्यावी लागणारी रक्कम कमी होईल. ज्याचा उपयोग नव्या योजनांसाठी केला जाऊ शकतो. सरकारचा हाच प्रयत्न आहे की, NHAI अधिक सक्षम होईल ज्यामुळे देशातील पायाभूत सुविधाचा विकास अधिक वेगाने होईल.