Abhinav Kashyap on Shah Rukh Khan : हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सिने-दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानवर टिका केली आहे. शाहरुख खानने दुबईला राहायला जावे असं त्यांनी म्हटलं आहे. शाहरुखच्या दुबईतील घरावरही टिप्पणी केली. सिने-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचे बंधू अभिनव कश्यप काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सलमान खानविरोधात अनेक गोष्टी बोलल्या आणि आता त्यांनी शाहरुख खानविरोधात वक्तव्य केलं आहे. अभिनव यांचं म्हणणं आहे की शाहरुखने भारत सोडून दुबईला शिफ्ट व्हावं कारण दुबईमधील त्यांच्या घराला "जन्नत" असं म्हटलं जातं. त्यांनी असंही म्हटलं की या लोकांना फक्त घेणं माहिती आहे देणं नाही. हे लोक फक्त घेतात, घेतात आणि घेतात. शाहरुख खानच्या दुबईमधल्या घराला 'जन्नत' म्हणतात आणि इथल्या घराला 'मन्नत'. याचा अर्थ काय? इथे तुमच्या सगळ्या मन्नतींचं उत्तर मिळतं."
advertisement
शाहरुखची डिमांड वाढत चालली आहे
अभिनव पुढे म्हणाले, "ते सतत प्रार्थना करतच असतात. मी ऐकलंय की त्याने त्याच्या बंगल्यात अजून 2 मजले बांधले आहेत. त्याची डिमांड दिवसेंदिवस वाढत आहे. पण जर त्याची 'जन्नत' तिथेच आहे, तर मग तिथेच का राहत नाही? तो भारतात काय करत आहे?".
'क्लिवेज किती डीप आहे' म्हणणाऱ्या त्या फॅनची काढली कुंडली, मराठी गायिका आनंदी जोशीनं समोर आणले प्रायव्हेट चॅट्स
शाहरुखच्या नीयतीवर टीका
शाहरुखच्या नीयतीवर टीका करत अभिनव पुढे म्हणाले, "चित्रपटांमध्ये ते डायलॉग्स मारतात की 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर'. या लोकांना काय म्हणावं? त्यांनी त्यांची घरं अशा ठिकाणी बनवली आहेत जिथे सामान्य लोक पोहोचूच शकत नाहीत. आम्हाला काय करायचंय त्यांच्या नेट वर्थशी? ते आपल्याला खायला देतात का? शाहरुख खान खूप छान बोलतो, पण त्याच्या नीयतीत गडबड आहे."
सलमानबद्दलही बोललेले अभिनव कश्यप
अभिनव कश्यप सलमानविरोधातही बोलले होते. सलमान खानविषयी त्यांनी म्हटलं होतं, "सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाबद्दल माझं मत हेच आहे की ते लोक नॉर्मल माणसं नाहीत. ते सिद्ध झालेले गुन्हेगावर आहेत. ते बेलवर आहेत. एक गुन्हेगार, गुन्हेगारच असतो. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला माहिती आहेत". त्यानंतर सलमान खाननेही यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. काही काम नसल्याने असं बरळत आहे, असं सलमान खान म्हणाला होता.
अभिनव कश्यप गेल्या काही दिवसांपासून हिंदी मनोरंजनसृष्टी बॉलिवूड अशा विविध गोष्टींबाबत आतली गोष्ट सांगताना दिसून येत आहेत. आपल्या वादग्रस्त वक्त्व्यामुळे ते चर्चेत आहे. आता या टिकेवर शाहरुख खान काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.