'क्लिवेज किती डीप आहे' म्हणणाऱ्या त्या फॅनची काढली कुंडली, मराठी गायिका आनंदी जोशीनं समोर आणले प्रायव्हेट चॅट्स
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Singer Anandi Joshi : प्रसिद्ध मराठी गायिका आनंदी जोशी हिने तिच्या फोटोवर वाईट कमेन्ट करणाऱ्या त्या फॅनची थेट कुंडलीच काढली. गायिकेनं प्रायव्हेट चॅट्स सर्वांसमोर आणले.
मुंबई : कलाकार मंडळी सोशल मीडियावर सक्रीय असतात. सोशल मीडियावर आपले फोटो व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. अनेकदा सोशल मीडियावर कलाकारांना ट्रोल देखील केलं जातं. तर कधी त्यांना त्यांच्या कपड्यांवरून, दिसण्यावरूनही नावं ठेवली जातात. अनेकदा कलाकारांवर अशी काही कमेन्ट केली जाते की त्यामुळे धक्काच बसतो. प्रसिद्ध मराठी गायिका आनंदी जोशी हिच्याबरोबर असाच काहीसा प्रकार घडला आहे. आनंदी जोशीवर तिच्याच एका फॅनने केलेली कमेन्ट तिनं सर्वांसमोर आणली आहे. इतकंच नाही तर तिने त्याची माहिती काढत सोशल मीडियावर त्याची पोलखोल केली आहे.
सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम गायिका आनंदी जोशी हिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक काही स्क्रिनशॉर्ट शेअर केलेत. तिने पहिला फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या फॅनसोबतचा आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, "हा व्यक्ती गेल्या वर्षी माझ्या कॉन्सर्टला आलेला. त्याने माझ्यासोबतचा फोटो सुद्धा पोस्ट केला होता. माझ्या DM ला माझं खूप कौतुक केलं. आणि आज सकाळी मी पाहिलं तर मला हा मेसेज दिसला."
advertisement
आनंदीने दुसऱ्या स्टोरीमध्ये आणखी एक स्क्रिनशॉर्ट शेअर केलाय. ज्यात आनंदीचा फोटो आणि त्याखाली कमेन्ट केलीये, "क्विवेज बघ किती डीप आहे."

तिसऱ्या स्टोरीमध्ये आनंदीने लिहिलंय, "खरंतर हा मेसेज त्याला त्याच्या दुसऱ्याच मित्राला सेंड करायचा होता असेल पण तो चुकून मला सेंड झाला. मी त्याला रिप्लायही केला की तू चुकून मला मेसेज केला आहेस का? त्यानंतर त्याने तो मेसेज डिलिट केला."
advertisement

चौथ्या स्टोरीमध्ये आनंदीने लिहिलंय, "एका अर्थी बरं झालं हे घडलं. त्यामुळे लोकांचं इंटेन्शन आणि त्यांची विचार करण्याची पद्धत समजली. मला एका गोष्टीचा धक्का बसला की तो एक Pediatrician आहे. तो मेडिकल व्यवसायाचा आहे. लोक आपल्या मुलांसाठी त्याच्यावर विश्वास ठेवतात. जी मुलं स्वत:ला सांभाळू शकत नाही किंवा आजारी असतात त्यांना वाचवण्याचा, सांभाळण्याचा त्याला आधिकार आहे."
advertisement

आनंदीने पुढे लिहिलंय, "हे त्याने केलेल्या मेसेजबद्दल नाही तर एका Pediatricianबद्दल आहे. जो एका मुलीला एक व्यक्ती म्हणून पाहणं टाळतो. तिच्या शरीरावर अशीही कमेन्ट करतो, त्याला मुलांना फिजिकली टच करण्याचा, बोलू शकत नसलेल्या आणि स्वत:चा बचाव करू शकत नसलेल्या बाळांना आणि लहान मुलांशी संपर्क साधण्याची परवानगी आहे. ही गोष्ट खरंच मला घाबरवणारी आहे. लोकांनी सांभाळून राहा आणि तुमच्या मुलांनी काळजी घ्या."
advertisement

शेवटच्या स्टोरीमध्ये आनंदीने लिहिलंय, "तुम्हीही कितीही म्हणालात की अशा लोकांच्या कमेन्टकडे दुर्लक्ष करावं तर मला तुम्हाला सांगायचं आहे की जर असं केलं तर त्यांना वाटेल की त्यांचं वागणं अगदी साधं आहे. हे असे लोक आहेत ज्यांच्यामध्ये महिला, मुले आणि प्राण्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची क्षमता आहे."
advertisement
महत्त्वाचं म्हणजे आनंदीने तिला DM करणाऱ्या त्या डॉक्टरची कुंडलीच काढली. तिने त्याच्या क्लिनिकचा पत्ता शोधून काढला आहे. त्या डॉक्टरचं नाव कौस्तुभ प्रभुदेसाई असून त्याचं बाणेर, पुणे येथे क्लिनिक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2025 8:30 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'क्लिवेज किती डीप आहे' म्हणणाऱ्या त्या फॅनची काढली कुंडली, मराठी गायिका आनंदी जोशीनं समोर आणले प्रायव्हेट चॅट्स