Smriti Mandhana : मराठमोळ्या स्मृतीच्या शिरपेचात मानाचा तुरा! 28 वर्ष जुना रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, वर्ल्ड रेकॉर्ड नावावर
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Smriti Mandhana Creates History : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण विश्वचषक सामन्यात स्मृती मानधनाने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला आहे.
IND W vs SA W : दक्षिण आफ्रिकेने एका रोमांचक सामन्यात भारताचा 3 विकेट्सने पराभव केला. नॅडिन डी क्लार्कच्या धमाकेदार फलंदाजीने टीम इंडियाच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. पण या सामन्यात स्मृती मानधना हिने मोठा रेकॉर्ड नावावर केला आहे. गेल्या 28 वर्षात कुणालाच जमलं नाही ते स्मृतीने करून दाखवलं आहे. भारताची स्टार महिला खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
1997 चा रेकॉर्ड मोडला
मानधनाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. मानधनाने या बाबतीत ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कला मागे टाकले. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कच्या नावावर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम होता. क्लार्कने 1997 मध्ये 970 धावा केल्या. आता, स्मृती मानधनाने या बाबतीत तिला मागे टाकले आहे. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने एकाच वर्षात 1000 धावांचा टप्पा गाठलेला नाही.
advertisement
1000 धावांचा टप्पा पार करणार?
स्मृती मानधना सध्या चांगल्या फॉरमध्ये आहे. त्यामुळे ती आता यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकाच वर्षातील 1000 धावांचा टप्पा पार करेल, अशी शक्यता आहे. स्मृती मानधनाने महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे. असे करणारी ती फक्त दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू असेल. तिच्या आधी, तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत 7805 धावा करणाऱ्या मिताली राजच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम आहे.
advertisement
दोन शतकांनंतर स्मृती फॉममध्ये...
दरम्यान, या वर्ल्ड कपमध्ये मानधनाने 18 च्या सरासरीने फक्त 54 धावा केल्या आहेत, ज्याचा स्ट्राईक रेट 72.97 आहे. वर्ल्ड कपपूर्वी मानधनाने 14 डावांमध्ये सुमारे 66 च्या सरासरीने 928 धावा केल्या होत्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2025 8:05 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : मराठमोळ्या स्मृतीच्या शिरपेचात मानाचा तुरा! 28 वर्ष जुना रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, वर्ल्ड रेकॉर्ड नावावर