व्हॉट्सॲप आणि ई-मेलवर अश्लील भाषेचा वापर
विनोद वर्मा यांनी सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुप आणि ४०० सदस्यांना पाठवलेल्या ई-मेलवर एका महिला सदस्याच्या पतीबाबत आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेचा वापर करून संबंधित महिलेचे चारित्र्यहनन केले. यापूर्वी अनेकदा वर्मा हे या महिला सदस्याचा पाठलाग करत होते आणि अश्लील हावभाव करत होते, मात्र बदनामीच्या भीतीने महिलेने तक्रार केली नव्हती.
advertisement
४०० सदस्यांच्या ई-मेलवर ही भाषा वाचल्यानंतर पत्नीला मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर तिने पती आणि कुटुंबाला ही बाब सांगितली. कुटुंबाने एकत्र येत पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला. तक्रारीचे स्वरूप गंभीर असल्याने समता नगर पोलिसांनी तातडीने तक्रार नोंदवून घेतली, आरोपीविरोधात ७९ (BNS) आणि ३५६ (२) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
राजकीय संबंधांचा वापर आणि मनमानी कारभार
सोसायटीतील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, विनोद वर्मा गेल्या तीन वर्षांपासून सचिव आहेत आणि ते कांदिवलीतील भाजपच्या एका कार्यकर्त्याशी संबंध ठेवून आपला प्रभाव दाखवत होते. या राजकीय कनेक्शनचा वापर करून ते सोसायटीत मनमानी कारभार चालवत होते. वर्मा यांच्यावर यापूर्वी २०२३ मध्येही याच सोसायटीतील एका महिलेच्या विनयभंगाचा एफआयआर दाखल आहे. त्यांनी यापूर्वी एका महिलेचा व्हिडीओ बनवून तिची बदनामी केल्याचेही समोर आले आहे.
निबंधकांच्या तपासणीत वर्मा यांच्याकडून सोसायटीत आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणूक झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या समितीला दोन वर्षांसाठी पदावरून काढण्यात आले असून, निवडणूक लढवण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
गृहमंत्री फडणवीसांना पत्र, कठोर कारवाईची मागणी
या गंभीर घटनेनंतर सोसायटीतील सदस्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. जर राजकीय पक्षाच्या नावाचा वापर करून महिला असुरक्षित असतील, तर आरोपी विनोद वर्मा यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे.
पीडित महिलेच्या पतीने स्पष्ट केले आहे की, पत्नीची बदनामी केल्याबद्दल ते आरोपी विनोद वर्मा यांच्या विरोधात उच्च न्यायालयात बदनामीचा दावा (Defamation Suit) दाखल करणार आहेत. या प्रकरणातील आरोपीवर पोलीस नेमकी काय आणि कधी कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.