TRENDING:

Success Story: नोकरीचा नाद सोडला, उच्चशिक्षित तरुणाचा दुग्ध व्यवसाय भारीच, वर्षाला 15 लाख रुपयांची उलाढाल

Last Updated:
उच्चशिक्षित आकाश पोपळे या तरुणाने नोकरीच्या मागे न जाता व्यवसायात उतरला. गाय पालनाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करून महिन्याला दीड लाख रुपयांची कमाई करत आहे.
advertisement
1/7
नोकरीचा नाद सोडला, तरुणाचा दुग्ध व्यवसाय भारीच, वर्षाला 15 लाख रुपयांची उलाढाल
उच्चशिक्षित आकाश पोपळे या तरुणाने नोकरीच्या मागे न जाता व्यवसायात उतरला, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील हिवरा गावात गाय पालनाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करून महिन्याला दीड लाख रुपयांची कमाई करत आहे.
advertisement
2/7
त्यांच्याकडे मूळच्या नेदरलँड्स आणि जर्मनीमधील असलेल्या होल्स्टीन-फ्रिजियन या प्रजातीच्या 9 ते 10 गायी आहेत. यातून दिवसभरात दोन वेळा 120 लिटर दूध काढून त्याची विक्री केली जाते, यातून वर्षाकाठी 10 ते 15 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे आकाशने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
3/7
गाय पालनाचा आणि दुग्ध व्यवसाय आकाशचे वडील आबासाहेब पोपळे यांनी सुरू केलेला, तोच व्यवसाय पुढे त्यांचा मुलगा पाहतो. दुग्ध व्यवसायातून साधारणपणे दररोज 4 ते 5 हजारांची उलाढाल होत असते, आणि महिन्याची कमाई 1 ते दीड लाखांपर्यंत होत असते. गायींच्या चारा-पाण्यासाठी कांडी गवत, मक्का, मुरघास त्यांना खाण्यासाठी देण्यात येतो.
advertisement
4/7
दररोज सकाळी 3 वाजल्यापासून कामे सुरू होतात, शेण काढणे, दूध काढणे, जनावरांना चारा-पाणी करणे तसेच संध्याकाळी देखील शेण काढणे, दूध काढणे ही सर्व प्रक्रिया सुरू असते.
advertisement
5/7
गाय पालन आणि दुग्ध विक्री हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. इतर खाजगी ठिकाणी कमी पगारात काम करण्यापेक्षा तरुणांनी स्वतःचाच व्यवसाय जर केला तर त्यातून चांगली कमाई होते.
advertisement
6/7
नोकरी करून 10 ते 12 हजार रुपयांच्या पगारासाठी धडपडण्यापेक्षा दुग्ध व्यवसायात महिन्याला मिळणारे उत्पन्न हे अधिक समाधानकारक आणि सुरक्षित आहे, असे देखील यावेळी आकाशकडून सांगण्यात आले आहे.
advertisement
7/7
या तरुणाने दुग्ध व्यवसायात घेतलेली ही मोठी झेप परिसरातील शेतकरी आणि तरुणांना देखील स्वयंपूर्ण बनवण्याची प्रेरणा देत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story: नोकरीचा नाद सोडला, उच्चशिक्षित तरुणाचा दुग्ध व्यवसाय भारीच, वर्षाला 15 लाख रुपयांची उलाढाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल