Fruit Farming : फळबाग लागवडीसाठी जमीन कशी निवडावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : आपलं राज्य हे कृषीप्रधान राज्य असून, येथे विविध प्रकारच्या फळपिकांचे उत्पादन घेतले जाते. आंबा, डाळिंब, केळी, संत्री, मोसंबी, सिताफळ, चिकू यांसारखी फळपिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मात्र, हे उत्तम उत्पादन मिळवण्यासाठी योग्य प्रकारची जमीन निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते. जर योग्य प्रकारची माती, हवामान, पाण्याची उपलब्धता आणि निचरा पाहूनच लागवड केली,तर पीक निरोगी वाढते आणि अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळेच, फळपिक लागवडीसाठी योग्य जमीन कशी निवडावी? हेच आपण जाणून घेणार आहोत..
advertisement
1/5

आपलं राज्य हे कृषीप्रधान राज्य असून, येथे विविध प्रकारच्या फळपिकांचे उत्पादन घेतले जाते. आंबा, डाळिंब, केळी, संत्री, मोसंबी, सिताफळ, चिकू यांसारखी फळपिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मात्र, हे उत्तम उत्पादन मिळवण्यासाठी योग्य प्रकारची जमीन निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते. जर योग्य प्रकारची माती, हवामान, पाण्याची उपलब्धता आणि निचरा पाहूनच लागवड केली,तर पीक निरोगी वाढते आणि अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळेच, फळपिक लागवडीसाठी योग्य जमीन कशी निवडावी? हेच आपण जाणून घेणार आहोत...
advertisement
2/5
फळ पिकांसाठी योग्य जमीन कशी असावी?फळ पिकांसाठी मातीचा प्रकार सर्वात महत्त्वाचा असतो.वेगवेगळ्या फळपिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी योग्य असतात.आंबा, चिकू: खोल, गाळाची किंवा लालसर माती, डाळिंब, द्राक्षे: वालुकामय (सैंडी) आणि चांगल्या निचऱ्याची माती ,केळी, पपई: भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली काळी माती, संत्री, मोसंबी: मध्यम काळी माती किंवा गाळाची माती
advertisement
3/5
निचरा (ड्रेनेज) चांगला असावा : जमिनीत पाण्याचा निचरा योग्य असला पाहिजे. जर पाणी साचले तर झाडांच्या मुळांना ऑक्सिजन कमी मिळतो आणि पिकांचे नुकसान होते. त्यामुळे जमिनीचा उतार आणि मातीतील निचऱ्याची क्षमता तपासून पहावी. पाण्याची उपलब्धता आणि व्यवस्थापन : फळपिकांना पुरेसे आणि नियमित पाणी मिळणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन (Drip Irrigation) किंवा तुषार सिंचन (Sprinkler Irrigation) वापरल्यास पाणी बचत होते आणि उत्पादन चांगले मिळते.
advertisement
4/5
हवामानाचा विचार करामहाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे हवामान असते. त्यानुसारच पिकांची निवड करावी. कोकण : उष्ण आणि दमट हवामान – आंबा, नारळ, सुपारी पश्चिम महाराष्ट्र: समशीतोष्ण हवामान – द्राक्षे, डाळिंब, केळी मराठवाडा: कोरडे हवामान – संत्री, मोसंबीविदर्भ: मध्यम उष्ण हवामान – संत्री, सिताफळ
advertisement
5/5
माती परीक्षण करून घ्याशेतीसाठी जमीन निवडण्यापूर्वी माती परीक्षण (Soil Testing) करून घ्यावे. यामुळे मातीतील सेंद्रिय पदार्थ, क्षारांचे प्रमाण, नायट्रोजन-फॉस्फरस-पोटॅशियम (NPK) घटकांची माहिती मिळते. माती परीक्षण केल्याने योग्य खतांचा वापर करता येतो. मातीचा pH स्तर 6.5 ते 7.5 असावा, फळ पिकांसाठी योग्य असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Fruit Farming : फळबाग लागवडीसाठी जमीन कशी निवडावी? जाणून घ्या सविस्तर माहिती