TRENDING:

नोकरीला केला रामराम, 3 महिन्यात कमावला शेतीत 3 लाखांचा नफा, तरुण शेतकऱ्यानं काय केलं?

Last Updated:
युवा शेतकरी नितीन वाडेकर यांनी 25 गुंठ्यात काकडी पिकाची लागवड केली होती. योग्य व्यवस्थापन करत 3 महिन्यात 3 लाखांचा फायदा मिळवला आहे.
advertisement
1/7
नोकरीला केला रामराम, 3 महिन्यात कमावला 3 लाखांचा नफा,  तरुण शेतकऱ्यानं काय केलं?
शेतीला आधुनिकतेची जोड देत अनेक युवा शेतकरी उत्तम भाजीपाला पिकवतात. यापैकीच सांगलीच्या आष्टा येथील नितीन वाडकर यांनी 25 गुंठे शेतात मल्चिंग पेपरवर काकडीची लागवड कली. यातून त्यांनी 3 महिन्यात 3 लाखांचा नफा मिळवला. आधुनिक पद्धतीने काकडीचे व्यवस्थापन कसे केले जाणून घेऊया.
advertisement
2/7
नितीन वाडकर यांनी 25 गुंठे शेतामध्ये मल्चिंग पेपर अंथरुण टोमॅटोची लागवड केली होती. लागण पूर्व मशागतीसाठी शेताची नांगरट केली. कच्ची सरी सोडून त्यानंतर रोटर मारून साडेपाच फूट अंतरावरती बेड तयार केले. टोमॅटोचे पीक काढल्यानंतर मल्चिंग पेपरचे त्यांनी बदलून घेतले. तारेचा भार कमी करून नाझिया जातीचा काकडीच्या बियांची टोकणी केली.
advertisement
3/7
काकडीचा बिया तीन पानांवर आल्यानंतर पहिली आळवणी घातली. त्यानंतर ठिबकच्या सहाय्याने एक आड एक दिवस चार अळवणी घातल्या. पुढे ठिबकच्या सहाय्याने तज्ज्ञांच्या सल्ल्याने खते सोडली.
advertisement
4/7
टोकन केल्यापासून 42 व्या दिवशी काकडीचा पहिला तोडा झाला. तीन महिन्यात काकडीचे 25 हून अधिक तोडे झाले. यातून 18 टणांहून अधिक काकडीचे उत्पादन मिळाले. काकडी मुंबई मार्केटला जात असून यंदा काकडीस विक्रमी भाव मिळाला.
advertisement
5/7
वाढत्या थंडीने बाजारपेठेत काकडीची आवक कमी झाली होती. यामुळे काकडे प्रति किलो सरासरी 40 रुपये प्रमाणे दर मिळाला. अपेक्षेपेक्षा अधिक दर मिळाल्याने नितीन यांना काकडी पिकातून 3 महिन्यात साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता 3 महिन्यात 3 लाखांचा नफा मिळाला.
advertisement
6/7
योग्य व्यवस्थाप करत 25 गुंठ्यातून 18 टनांहून अधिक काकडीचे उत्पादन घेतले आहे. तसेच लागण पूर्व मशागतीचा खर्च वाचल्याने पीक लावण्यापूर्वीच पंधरा-वीस हजारांची बचत झाली होती. भरघोस उत्पादन आणि उत्तम बाजार भाव असल्याने काकडीतून समाधानकारक नफा मिळाल्याचे नितीन सांगतात.
advertisement
7/7
खाजगी नोकरीला रामराम ठोकून नितीन शेतीकडे वळले आहेत. त्यांच्याकडे सात एकर शेत जमीन असून ते प्रयोगशील शेती करतात. टोमॅटोचे पीक घेतलेल्या शेतामध्येच मल्चिंग पेपर आणि मशागतीच्या खर्चाची बचत करत त्यांनी यंदा काकडी पिकाचा प्रयोग केला आहे. कृषी तज्ज्ञांच्या मदतीने शेतीचे व्यवस्थापन करत काकडी पिकातून 3 महिन्यात 3 लाखांचा नफा कमवला. योग्य नियोजन आणि काटेकोर व्यवस्थापन केल्यास नोकरीपेक्षा शेतीच फायदेशीर ठरत असल्याचे नितीन यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
नोकरीला केला रामराम, 3 महिन्यात कमावला शेतीत 3 लाखांचा नफा, तरुण शेतकऱ्यानं काय केलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल