TRENDING:

रिस्क घेतली अन् नोकरी सोडली, दुष्काळी भागात शेती करुन कमावले 1300000!

Last Updated:
Pomegranate Farming: खासगी क्षेत्रातील नोकरी सोडून सांगलीच्या तरुणाने डाळिंबाची शेती केलीये. या डाळिंब शेतीतून वर्षाला 13 लाख रुपयांची कमाई होतेय.
advertisement
1/7
रिस्क घेतली अन् नोकरी सोडली, दुष्काळी भागात शेती करुन कमावले 1300000!
अवर्षणप्रवण भागात शेती करणे तसे आव्हानात्मकच असते. मात्र, प्रयोगशीलता व सचोटीने काही शेतकरी चांगले उत्पन्न मिळवत आहेत. सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळी मानला जातो. मात्र येथील प्रयोगशील शेतकरी पांडुरंग सावंत यांनी आधुनिक शेतीचा मार्ग पत्करत डाळिंबाची शेती केलीये. अगदी कमी खर्चात त्यांनी 2 एकर क्षेत्रावर डाळिंबाची बाग फुलवली असून यातून ते लाखोंचे उत्पन्न घेत आहेत.
advertisement
2/7
पांडुरंग विठ्ठल सावंत हे जत तालुक्यातील माडग्याळ गावचे रहिवासी आहेत. त्यांनी कला शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच काही वर्ष परराज्यामध्ये खाजगी नोकरी केली. परंतु, शेतीची आणि मातीची ओढ असल्याने ते नोकरीत रमले नाहीत. सात वर्षांपूर्वी ते गावी परतले.
advertisement
3/7
वडील मंडळी करत असलेली पारंपारिक कोरडवाहू शेती पाहिली. पावसाच्या जीवावर मका, शाळू, बाजरी यासारखी पिके घेऊन हाती फारसे काही मिळत नाही, हे त्यांनी समजले. तेव्हा आधुनिक शेतीचा मार्ग पत्करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
advertisement
4/7
काही संस्थांचे आणि कृषी अधिकाऱ्यांचे सावंत यांनी मार्गदर्शन घेतले. 70 ते 80 हजार रुपयांची गुंतवणूक करून सुमारे दोन एकर जागेत 400 डाळिंबाची रोपे लावली. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन केले आहे.
advertisement
5/7
औषधे, रोजगार आणि बाजारपेठेचे अचूक नियोजन करत दुष्काळी भागातील सावंत यांनी डाळिंब पिकातून दिमाखदार भरारी घेतली आहे. त्यांच्या डाळिंब बागेतून प्रतिवर्षी चांगले उत्पादन निघते. बाजारपेठेची स्थिती योग्य असेल तेव्हाच ते हार्वेस्टिंग करतात. प्रतिवर्षी सरासरी 13 लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे सावंत सांगतात.
advertisement
6/7
मन लावून कष्ट केले तर शेतीमध्ये उत्तम नफा मिळवता येतो. नोकरीच्या मागे न धावता पांडुरंग सावंत डाळिंब पिकातून भरघोस उत्पन्न घेत आहेत. चांगल्या नोकरीपेक्षाही शेतीत चांगले उत्पन्न मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
advertisement
7/7
पाण्याचे अचूक नियोजन करत दुष्काळी भागात शेती पिकवण्याचे आव्हान त्यांनी पेलले आहे. तसेच आपल्या कृतीतून त्यांनी तरुणांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. (प्रीती निकम, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
रिस्क घेतली अन् नोकरी सोडली, दुष्काळी भागात शेती करुन कमावले 1300000!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल