TRENDING:

सुशांतची शांतीत क्रांती! वडिलांच्या मार्गदर्शनात घेतलं हळदीचं एकरी 42 टन उत्पादन!

Last Updated:
Turmeric Farming: सांगलीच्या युवा शेतकऱ्यानं कमालच केलीये. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत सुशांते हळदीचं विक्रमी उत्पादन घेतलंय.
advertisement
1/9
सुशांतची शांतीत क्रांती! वडिलांच्या मार्गदर्शनात घेतलं हळदीचं एकरी 42 टन उत्पादन
अनुभवाला कठोर परिश्रमाची साथ असेल तर शेतीतूनही उत्तम नफा मिळवता येतो, एका शेतकऱ्याने सिद्ध करुन दाखवले आहे. सुशांत जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सांगली जिल्ह्यातील आसद येथील रहिवासी आहेत.
advertisement
2/9
सुशांत जाधव हे मागील 12 वर्षांपासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली हळद पीक घेत आहेत. अलीकडच्या पाच वर्षात एकरी 42 क्विंटल हळदीच्या उत्पादन त्यांनी घेतले आहे. नेमका हा आलेख त्यांनी कसा चढता ठेवला, त्यातून त्यांना कसा फायदा झाला, याचबाबत आपण जाणून घेऊयात.
advertisement
3/9
हळद उत्पादक सुशांत जाधव यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, “मागील 12 वर्षांपासून आम्ही हळदीचे पीक घेत आहोत. सुरुवातीला वडील पारंपारिक पद्धतीने हळद पीक घेत होते. अलीकडच्या 5-7 वर्षांत मी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीचा वापर करून हळदीचे पीक घेत आहे.”
advertisement
4/9
“दरवर्षी क्षेत्र बदलून आम्ही हळद लावतो. यामुळे ऊस पिकापासून शेताला विश्रांती मिळते. पीक फेरपालट झाल्याने उत्पादन चांगले मिळते. शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मशागतीसह हळदीची लागवड ही यंत्राद्वारे होते”, असे ते म्हणाले.
advertisement
5/9
आधुनिकतेचा वापर केल्यास कमी मजुरात, कमी खर्चात जास्त नफा घेता येतो. हळदीच्या पोषकतेसाठी आम्ही एकरी 8 ते 10 ट्रॉली शेणखत घालतो. हळद लागवडीनंतर सेंद्रिय खते आणि फवारण्या वापरतो, असंही सुशांत सांगतात.
advertisement
6/9
“काही प्रमाणात रासायनिक खतांचाही वापर करावा लागतो. परंतु सेंद्रिय खतांमुळे हळदीचा फुटवा चांगला होऊन काळोखी सुद्धा चांगली येते. बाजारपेठेचा अभ्यास करूनच हळद विक्रीसाठी मार्केटला देतो,” अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
7/9
तरुण शेतकरी सुशांत जाधव यांना त्यांच्या कुटुंबाची मोठी साथ आहे. यामुळे शेतीत नवनवीन प्रयोग करणे शक्य होत असल्याचे त्यांनी लोकल18 बोलताना सांगितले. ते एका क्षेत्रात सतत एकच पीक न घेता पीक बदल करतात. हळद पिकाचा नेमका अभ्यास असल्याने दरवर्षी शेत बदलून ते हळदीचे पीक घेत आहेत. अलीकडे उत्तम प्रकारचे सेलम जातीचे बियाणे त्यांनी घरीच जतन केले आहे.
advertisement
8/9
हळद लागवड करण्यापूर्वी एकरी 8 ते 10 ट्रॉली शेणखत टाकून मशागत करतात. बेड पद्धतीने हळद पिकाची यंत्राद्वारे लागवड करतात. ठिबक व पोटपाठाद्वारे पाणी देतात. माफक खर्च, कमी मजूर व आधुनिक टेक्नॉलॉजीद्वारे हळद पिकातून चांगलं उत्पन्न मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
advertisement
9/9
शिवाय मार्केटचा अंदाज घेऊनच हळद विक्रीला देतात. योग्य बाजारभाव मिळेपर्यंत जवळच्या शीतगृहात हळद ठेवली जाते. ‘मार्केटचा अंदाज घेऊनच विक्री’ केल्याने चांगले पैसे मिळत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. (प्रीती पाटील)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
सुशांतची शांतीत क्रांती! वडिलांच्या मार्गदर्शनात घेतलं हळदीचं एकरी 42 टन उत्पादन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल