यंदाच्या पितृपक्षात या राशींवर येणार संकट, 2 ग्रहण असणार, काय काळजी घ्याल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : 2025 मध्ये पितृपक्षाची सुरुवात अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटनांनी होणार आहे. यावर्षी पितृपक्षाच्या काळात सलग दोन महत्त्वाची ग्रहणे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण घडणार आहेत.
advertisement
1/6

2025 मध्ये पितृपक्षाची सुरुवात अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटनांनी होणार आहे. यावर्षी पितृपक्षाच्या काळात सलग दोन महत्त्वाची ग्रहणे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण घडणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, अशा प्रकारचा योग विरळाच घडतो आणि तो धार्मिक, सामाजिक तसेच खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो.
advertisement
2/6
चंद्रग्रहण -  भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेला होणारे हे चंद्रग्रहण रात्री 9:57 वाजता सुरू होईल आणि 8 सप्टेंबरच्या पहाटे 1:27 वाजेपर्यंत राहील. साधारण 3 तास 30 मिनिटांचा हा कालावधी असेल. हे ग्रहण भारतासह आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका आणि पॅसिफिक महासागरातील अनेक देशांमध्ये दिसणार आहे. भारतात ग्रहण स्पष्टपणे दिसणार असल्याने त्याचा सुतक काळ दुपारी 12:57 पासून सुरू होईल. या ग्रहणाचा प्रभाव कुंभ राशी आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर अधिक जाणवेल. या काळात मानसिक अस्थिरता, अचानक निर्णय घेण्यात चुका किंवा आरोग्याशी संबंधित त्रास जाणवू शकतो. ज्योतिषी सावधगिरीचा सल्ला देत आहेत.
advertisement
3/6
सूर्यग्रहण -  आश्विन महिन्याच्या अमावस्येला होणारे हे सूर्यग्रहण रात्री 10:59 वाजता सुरू होईल आणि 22 सप्टेंबर रोजी पहाटे 3:23 वाजता संपेल. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने येथे सुतक लागू होणार नाही. हे ग्रहण कन्या राशीत आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात घडणार आहे. यावेळी सूर्य, चंद्र आणि बुध एकत्र येतील आणि शनिदेव मीन राशीतून दृष्टी टाकतील. हा संयोग राजकीय व सामाजिक घडामोडींवर परिणाम करू शकतो. विशेषतः कन्या राशीच्या व्यक्तींनी या काळात निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी.
advertisement
4/6
दुहेरी ग्रहणाचा प्रभाव ज्योतिषशास्त्रानुसार, एकाच महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होणे अपवादात्मक मानले जाते. यामुळे नैसर्गिक आपत्ती, भूकंप, पूर, वादळ यांची शक्यता वाढते. इतिहासाकडे पाहिले तर 1979 मध्ये अशाच प्रकारच्या ग्रहणांच्या काळात गुजरातमधील मोरबी धरण फुटल्याची दुर्घटना घडली होती. तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय तणाव, युद्धस्थिती, आर्थिक चढ-उतार आणि सामाजिक अस्थिरतेच्या घटनाही दिसून आल्या होत्या.
advertisement
5/6
ग्रहणकाळातील नियम -  धर्मशास्त्रानुसार ग्रहणकाळात मंदिरांमध्ये पूजा करणे, मूर्तींना स्पर्श करणे टाळावे. कात्री, सुया किंवा इतर तीक्ष्ण वस्तू वापरू नयेत. प्रवास टाळावा आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. ग्रहण संपल्यानंतरच शिजवलेले अन्न खावे, असा सल्ला दिला जातो.
advertisement
6/6
अशुभ परिणाम कमी करण्याचे उपाय - ग्रहणाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी हनुमान चालीसा, महामृत्युंजय मंत्र किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून मंदिरांची शुद्धी करावी, दानधर्म करावा आणि भगवान शिव तसेच माता दुर्गेची आराधना करावी. (सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
यंदाच्या पितृपक्षात या राशींवर येणार संकट, 2 ग्रहण असणार, काय काळजी घ्याल?