TRENDING:

Actress Affair: विवाहित रोहित शेट्टीच्या प्रेमात होती अभिनेत्री, आज 36 व्या वर्षीही सिंगल, का केलं नाही लग्न?

Last Updated:
Actress Affiar: बॉलिवूडमधील सुपरहिट दिग्दर्शक रोहित शेट्टी आज लाखोंच्या हृदयावर राज्य करतो. त्याचे अ‍ॅक्शनपट, कॉमेडी सिनेमा आणि स्टार्ससोबतची दोस्ती कायम चर्चेत असते.
advertisement
1/7
विवाहित रोहित शेट्टीच्या प्रेमात होती अभिनेत्री, आज 36 व्या वर्षीही सिंगल
बॉलिवूडमधील सुपरहिट दिग्दर्शक रोहित शेट्टी आज लाखोंच्या हृदयावर राज्य करतो. त्याचे अ‍ॅक्शनपट, कॉमेडी सिनेमा आणि स्टार्ससोबतची दोस्ती कायम चर्चेत असते. पण पडद्यामागे त्याच्या आयुष्यातही एक प्रेमकथा आहे, जी खूप वादग्रस्त ठरली.
advertisement
2/7
रोहित शेट्टी विवाहित असूनही, एका सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याची चर्चा त्या काळी फिल्मसिटीपासून ते गॉसिप कॉलमपर्यंत पोहोचली होती. ही अभिनेत्री म्हणजे प्राची देसाई.
advertisement
3/7
'कसम से' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि नंतर 'रॉक ऑन' व 'बोल बच्चन' सारख्या चित्रपटांत दिसलेली प्राची, तिच्या साधेपणामुळे आणि सौंदर्यामुळे अनेकांची फेव्हरेट होती.
advertisement
4/7
'बोल बच्चन'च्या सेटवरच रोहित आणि प्राचीची जवळीक वाढल्याची चर्चा होती. इतकंच नव्हे तर जयपूरमध्ये शूटिंगदरम्यान रोहितने खास तिच्यासाठी रोमँटिक डिनरची तयारी केली होती. इंडस्ट्रीत तर अफवा पसरल्या की दोघे गुपचूप लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.
advertisement
5/7
त्या काळात असं म्हटलं जायचं की प्राचीच्या प्रेमात अडकलेला रोहित आपल्या पत्नी आणि मुलापासून दुरावला होता. अगदी पत्नीला सोडण्यापर्यंत तो तयार असल्याच्या बातम्याही समोर आल्या.
advertisement
6/7
कुटुंबावरील जबाबदारी विसरणं त्याला शक्य नव्हतं. त्यामुळे त्याने प्राचीपासून दूर जाण्याचा आणि पत्नीकडे परतण्याचा निर्णय घेतला. अखेर त्याने स्वतःला प्राचीपासून दूर केलं आणि नातं संपलं.
advertisement
7/7
ब्रेकअपनंतर रोहित पुन्हा पूर्णपणे सिनेमाकडे वळला आणि आज तो बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. दुसरीकडे, प्राची देसाई हळूहळू चित्रपटांतून दूर झाली. तिचा शेवटचा 2022 मधील चित्रपट 'फॉरेन्सिक'होता. मात्र, ती अजूनही तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actress Affair: विवाहित रोहित शेट्टीच्या प्रेमात होती अभिनेत्री, आज 36 व्या वर्षीही सिंगल, का केलं नाही लग्न?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल