Aajache Rashibhavishya: भ्रमात राहू नका, आजची संधी पुन्हा नाही! मेष ते मीन 16 जुलैचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Horoscope Today: आज 16 जुलै रोजी सर्व राशींवर ग्रहांच्या हालचालींचा प्रभाव राहणार आहे. काही राशींसाठी दिवस चांगला असेल तर काहींसाठी आजचा दिवस फारसा अनुकूल नसेल.
advertisement
1/13

मेषः कार्यालयीन कामासाठी तातडीचे प्रवास घडतील. इम्पोर्ट-एक्स्पोर्टचे व्यवसाय तेजीत चालतील. वाढत्या खर्चात जमाखर्चाचा तराजू डळमळीत होईल. शुभ अंक 1, शुभ रंग मरून
advertisement
2/13
वृषभः आज तुमच्यासाठी दिवस लाभाचा. कोणत्याही नव्या उपक्रमाची सुरुवात आज यशस्वीपणे करू शकाल. मित्र आज दिलेली आश्वासने पाळतील. शुभ अंक 1, शुभ रंग भगवा
advertisement
3/13
मिथुनः कोणतीही गोष्ट सहज मिळेल या भ्रमात राहू नका. कष्टांचे फळ मात्र नक्कीच मिळेल. नकारात्मक मनोवृत्तीच्या मंडळींपासून दूर राहा. व्यर्थ वाद टाळा. शुभ अंक 3, शुभ रंग मोरपंखी
advertisement
4/13
कर्क: आज चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यातून होत असताना ज्येष्ठांचा देवधर्म व दानधर्माकडे कल वाढेल. श्रद्धाळूना उपासनेची प्रचिती येईल. प्रसन्न वाटेल. शुभ अंक 4, शुभ रंग भगवा
advertisement
5/13
सिंह: जे कळत नाही त्यात वेळ वाया घालवू नका. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामावरच लक्ष केद्रित करा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकणे हिताचे. शुभ अंक 5, शुभ रंग सोनेरी
advertisement
6/13
कन्याः व्यवसायात चढाओढ वाढलेली असताना निर्णय घेण्यास विलंब करू नका. पूर्वीचीच चूक परत नको. वैवाहिक जीवनात जुने विषय उगाळू नका. शुभ अंक 2, शुभ रंग डाळिंबी
advertisement
7/13
तूळः कार्यक्षेत्रात हितशंत्रूचा जोर वाढलेला असताना क्षुल्लक चुका करून त्यांना आयती संधी देऊ नका. नोकरदारांनी फक्त वरिष्ठांच्या आज्ञा पाळाव्यात. शुभ अंक 5, शुभ रंग स्ट्रॉबेरी
advertisement
8/13
वृश्चिकः कार्यक्षेत्रात नवीन विषय शिकण्याची संधी चालून येईल. उच्चशिक्षित मंडळींच्या अपेक्षा वाढतील. नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. शुभ अंक 9, शुभ रंग निळा
advertisement
9/13
धनू: वास्तू-वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील. आज काही आवडते पाहुणे घरी पायधूळ झाडतील. विद्यार्थी आज पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. शुभ अंक 7, शुभ रंग राखाडी
advertisement
10/13
मकर : व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजू नका. आपल्या भावी योजना जाहीर करण्याची घाई करू नका. गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवणे हिताचे. शुभ अंक 8, शुभ रंग क्रीम
advertisement
11/13
कुंभ : आज तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने मनःस्थितीही उत्तम असेल. आज कुणाला सल्ले देण्यापेक्षा गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्या. शुभ अंक 6, शुभ रंग पिस्ता
advertisement
12/13
मीनः आज तुम्ही जरा हट्टीपणाने वागाल. इतरांशी जमवून घेणे अवघड जाईल. उगीच वाद ओढवून घ्याल. जोडीदाराकडे मात्र मन मोकळे करावेसे वाटेल.शुभ अंक 9, शुभ रंग निळा
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घेणे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: भ्रमात राहू नका, आजची संधी पुन्हा नाही! मेष ते मीन 16 जुलैचं राशीभविष्य