TRENDING:

Aajache Rashibhavishya: गणेश चतुर्थीच्या मंगल मुहूर्तावर तुमच्या नशिबी काय? पाहा मेष ते मीन आजचं राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: आज 27 ऑगस्ट रोजी सर्वांच्या लाडक्या गणरायचे आगमन झालेले आहे. गणेश चतुर्थीच्या मंगलमय योगावर 12 राशींसाठी दिवस उत्तम असून तुमचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13
गणेश चतुर्थीच्या मंगल मुहूर्तावर तुमच्या नशिबी काय? मेष ते मीन आजचं राशीभविष्य
मेष राशी -तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. तुम्ही तुमच्या खास पद्धतीने लोकांना हाताळलेत आणि तुमची बुद्धिमत्ता वापरलीत तर लोकांना समजावण्यात, पटविण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी - या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. आजच्या दिवशी कुठल्याही माहिती नसलेल्या गोष्टीत हात घालू नका. नुकसानीत पडाल. आपण जर परदेशातील नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर अर्ज करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी - वाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. विवाहित दांपत्यांना आज आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे. आज तुम्हाला जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. तुमच्या कामात तुमच्या विचारांशी-आवडीनिवडींशी मिळत्याजुळत्या व्यक्तींची मदत घ्या. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी -तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्ती होईल. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
6/13
कन्या राशी -आज शांत राहा-तणावमुक्त राहाल. जे लोक आतापर्यंत पैशाचा विचार न करता खर्च करत होते त्यांना आज पैशाची अधिक आवश्यकता पडू शकते आणि आज तुम्हाला समजेल की, पैशाची आपल्या जीवनात काय किंमत असते. आज पासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा. अविवाहित लोकांना आज आनंदाची बातमी मिळेल. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
7/13
तूळ राशी - आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काही तरी करणे गरजेचे आहे. कार्य क्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी - आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी - आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. जोडीदाराकडून आज चांगली बातमी मिळणार. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी - धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज केलेले सर्व कामे मार्गी लागतील. आपल्या जोडीदाराकडून आज काहीतरी आनंदाची बातमी ऐकून तुमचा दिवस आज आनंदी जाणार आहे. प्रवासाचा योग आज आहे पण प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौजमजा, विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाहीत, विशेषत: तुम्ही धोरणीपणाने वागला नाहीत तर नव्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी - आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. आज तुमच्या जोडीदार तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहे. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: गणेश चतुर्थीच्या मंगल मुहूर्तावर तुमच्या नशिबी काय? पाहा मेष ते मीन आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल