रील ते रिअल लाईफ 'हमसफर'! बोटीवर फिल्मी स्टाइल प्रपोज, कशी सुरू झालेली सौरभ-योगिताची Love Story?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Yogita Chavan and Sourabh Chougule Love Story : छोट्या पडद्यावरील जीव माझा गुंतला मालिकेतील अंतरा आणि मल्हार यांनी खऱ्या आयुष्यातही एकत्र आले होते. दोघांच्या डिवोर्सची सध्या चर्चा सुरू आहे. पण तुम्हाला माहितीये का दोघांची रील टू रिअल लव्ह स्टोरी कशी सुरू झाली होती?
advertisement
1/10

जीव माझा गुंतला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अंतरा आणि मल्हार यांची जोडी रिअल लाइफमध्येही एकत्र आली.
advertisement
2/10
मालिकेनंतर अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या दीड वर्षांनी दोघे विभक्त झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. न्यूज18मराठीने योगिताशी संवाद साधला असला तिने पर्सनल लाईफबद्दल बोलायचं नाही असं म्हणत बोलणं टाळलं.
advertisement
3/10
सौरभ आणि योगिता यांच्या डिवोर्सच्या चर्चा समोर आल्यानंतर चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे. कारण दोघेही प्रेक्षकांसाठी लाडकं कपल होतं. दोघांची रील टू रिअल लव्ह स्टोरी कशी सुरू झाली होती माहितीये?
advertisement
4/10
सौरभ आणि योगिता पहिल्यांदात जीव माझा गुंतला या मालिकेच्या लुक टेस्टला भेटले होते. आपल्याला शो पुढे न्यायचा आहे ही भावना दोघांच्या मनात होती. सीन्समध्येही एकमेकांना मदत करायचे.
advertisement
5/10
मालिकेचा ट्रॅक जस जसा रुळावर येत होता तशीच सौरभ आणि योगिताच्या मैत्रीही रुळावर येत होती.
advertisement
6/10
तीन वर्षांच्या मैत्रीनंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. 1 वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
7/10
दोघांनी मालिकेसाठी अनेक रील व्हिडीओ शूट केले होते ज्यात त्यांची केमिस्ट्री स्पष्टपणे दिसत होती. त्यामुळे चाहत्यांना देखील त्यांच्या रिलेशनशिपचा अंदाज आला होता.
advertisement
8/10
योगिताने एका मुलाखतीत सांगितलं होतं, आम्ही त्यानंतर रील्स टाकणं कमी केलं होतं. आम्ही पहिल्यापासून शूटसाठी एकत्र होतो त्यामुळे सौरभने प्रपोज केल्यानंतर काही वेगळं वाटलं नाही.
advertisement
9/10
सौरभने योगिताला प्रपोज केलं त्यानंतर योगिताने वेळ घेऊन लग्नासाठी होकार दिला. लग्न ठरल्यानंतर सौरभने योगिताला फोटोशूटच्या बहाण्याने बोलावून बोटीवर फिल्मी स्टाइलने प्रपोज केलं होतं.
advertisement
10/10
3 मार्च 2024 ला दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर दोघांचे अनेक रोमँटीक व्हिडीओ ते शेअर करत होते. दोघांनी स्वत:चं नवीन घरही खरेदी केलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रील ते रिअल लाईफ 'हमसफर'! बोटीवर फिल्मी स्टाइल प्रपोज, कशी सुरू झालेली सौरभ-योगिताची Love Story?