TRENDING:

Guru Astrology: बिग अलर्ट! गुरू अतिचारी होतोय, या 4 राशींना वाईट ग्रहण लागणार; 2032 पर्यंत अस्थिरता

Last Updated:
Guru Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, एक मोठी घटना लवकरच घडणार आहे. गुरू ग्रह अतिचारी होणार आहे. १४ मे रोजी गुरू ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत जाणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात अतिचारी चाल म्हणजे खूप वेगाने भ्रमण करणे. गुरू ग्रह पुढील ८ वर्षे म्हणजेच २०३२ सालापर्यंत अतिचारी चाल करणार आहे.
advertisement
1/6
बिग अलर्ट! गुरू अतिचारी होतोय, या 4 राशींना ग्रहण लागणार; 2032 पर्यंत अस्थिरता
साधारणपणे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी गुरूला १२ ते १३ महिने लागतात. परंतु यावेळी गुरू वर्षातून तीन वेळा आपली चाल बदलणार आहे. त्यामुळे काही राशींना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
2/6
या राशींना अत्यंत सावधगिरीने कामे करण्याची आवश्यकता आहे. दर गुरुवारी गुरु ग्रहाची पूजा करण्याचा सल्ला दिला जात आहे. गुरु ग्रहाच्या अतिचारी चालीमुळे कोणत्या राशींना अडचणी येऊ शकतात त्याविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/6
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांना गुरू ग्रहाच्या अतिचारी चालीमुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. याशिवाय, गुरू ग्रह तुमच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम करू शकतो. या काळात पैसे आणि मालमत्तेची विशेष काळजी घ्या, महत्त्वाची सर्व कागदपत्रे नीट तपासा. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात ही योजना पुढे ढकला.
advertisement
4/6
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिचारी गुरु मध्यम परिणाम देणारा असणार आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात, ज्यामुळे ते महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत, कामात अडचणी येऊ शकतात. या राशीच्या लोकांना नोकरी बदलण्याची संधी मिळेल, परंतु या संधी फार चांगल्या नसतील. शिवाय कामाच्या ठिकाणी वरिष्ठांमुळे त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.
advertisement
5/6
कर्क - कर्क राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात अतिचारी गुरु समस्या निर्माण करू शकतो. या काळात जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात, नात्यात चांगलीच कटुता येऊ शकते, बोलणं चांगलं ठेवा, एकमेकांना समजून घ्या. टोकाचे निर्णय टाळा. व्यावसायिकांच्या योजना सपशेल अयशस्वी होतील, ज्यामुळे त्यांचे खर्च भागणार नाहीत.
advertisement
6/6
धनु - गुरू ग्रह अतिचारी असल्याने धनु राशीच्या लोकांना पैशाचा वापर काळजीपूर्वक करण्याचा सल्ला दिला जातोय. अनावश्यक खर्चामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते. या काळात व्यावसायिकांनी आपल्या वरिष्ठांशी बोलताना चुकीचे शब्द वापरू नये. तुमच्या उत्पन्नातही घट दिसून येऊ शकते. तुम्ही पैसे कमवले तरी ते गमावण्याचा धोका सतत असेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Guru Astrology: बिग अलर्ट! गुरू अतिचारी होतोय, या 4 राशींना वाईट ग्रहण लागणार; 2032 पर्यंत अस्थिरता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल