TRENDING:

Rashifal: भद्र राजयोग जुळून आल्यानं पालटणार नशीब! या 3 राशींना बक्कळ कमाईचे योग

Last Updated:
Budh Gochar in Kanya 2023: ऑक्टोबर महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण ग्रहांचे संक्रमण होत आहे. ज्यामध्ये बुधाच्या संक्रमणाने महिन्याची सुरुवात झाली. यानंतर मंगळ, सूर्य, शुक्र आणि राहू-केतूचेही संक्रमण होईल. या सर्व ग्रहांच्या संक्रमणामुळे ऑक्टोबर 2023 अनेक राशींसाठी खूप खास असणार आहे.
advertisement
1/5
भद्र राजयोग जुळून आल्यानं पालटणार नशीब! या 3 राशींना बक्कळ कमाईचे योग
1 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा राजकुमार मानल्या जाणाऱ्या बुध ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केल्यानं भद्र राजयोग तयार झाला आहे. ज्योतिषशास्त्रात भद्र राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. धन, व्यवसाय, बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती देणाऱ्या बुध ग्रहाचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल.
advertisement
2/5
विशेषत: 3 राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या भाग्यशाली राशी आहेत, ज्यांना बुध संक्रमणामुळे फायदा होईल.
advertisement
3/5
कन्या : बुधाचे संक्रमण होऊन कन्या राशीत प्रवेश झाला आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी भद्र राजयोग खूप फायदेशीर ठरेल. या लोकांचा कामातील आत्मविश्वास वाढेल. कार्यशैलीत आणि बोलण्याच्या शैलीत सकारात्मक बदल तुम्हाला शुभ परिणाम देतील. भागीदारीत काम करणाऱ्यांना चांगला फायदा होईल. तुमचे मनोबल उंच राहील, त्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. तुम्हाला एकामागून एक यश मिळेल. व्यावसायिकांना यावेळी मोठा फायदा होऊ शकतो.
advertisement
4/5
मकर : मकर राशीच्या लोकांनाही भद्र राजयोग खूप अनुकूल परिणाम देईल. या राशीच्या लोकांचे भाग्य जोमात असेल. सर्व कामे पूर्ण होतील. नशीब तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देईल. या काळात तुम्ही जमीन किंवा वाहन खरेदी करू शकता. लहान किंवा लांब प्रवास करू शकता. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होईल. तुमचे राहणीमान सुधारेल.
advertisement
5/5
धनु: भद्र राजयोग तयार झाल्यामुळे धनु राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिक बाबतीत खूप फायदा होईल. या राशीच्या व्यावसायिकांना नवीन ऑर्डर मिळतील. तुम्ही भरपूर कमवाल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरी मिळू शकते. तुमच्या जबाबदाऱ्यांसोबतच तुमचा पगारही वाढेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. तुमची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. नवीन काम सुरू करू शकाल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Rashifal: भद्र राजयोग जुळून आल्यानं पालटणार नशीब! या 3 राशींना बक्कळ कमाईचे योग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल