Astrology: वर्ष 2026 मध्ये 6 महिने या राशींवर धनवर्षा-प्रमोशन! गुरूच्या राशीपरिवर्तनाने आयुष्य सेट
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Guru Gochar 2026: देवांचा गुरू मानला जाणारा गुरू ग्रह वर्ष 2026 मध्ये 2 वेळा महत्त्वाचे राशी परिवर्तन करणार आहे. पहिले गोचर 2 जून 2026 रोजी होईल आणि दुसरे 31 ऑक्टोबर 2026 रोजी होईल. गुरू गोचर झाल्यावर 6 महिने 5 राशीच्या लोकांना खास लाभ देऊ शकतात.
advertisement
1/7

गेल्या 18 ऑक्टोबरला गुरूने गोचर करून कर्क राशीत प्रवेश केला आहे आणि आता 5 डिसेंबर 2025 रोजी राशी परिवर्तन करून मिथुन राशीत येतील. यानंतर 2 जून 2026 पर्यंत गुरू मिथुन राशीतच गोचर करतील.
advertisement
2/7
वर्ष 2026 चे 6 महिने मालामाल करतील - 2 जूनला गोचर करून पुन्हा कर्क राशीत जाण्यापूर्वी देवगुरु गुरू ग्रह 5 राशीच्या लोकांवर भरभरून कृपा करू शकतो. ज्ञान, गुरू, धन, यश आणि सुख-सौभाग्याचे कारक ग्रह असलेला गुरू ग्रह जानेवारी 2026 पासून जून 2026 च्या सुरुवातीपर्यंत कोणत्या 5 राशींचे भाग्य उजळवेल, त्याविषयी जाणून घेऊ.
advertisement
3/7
वृषभ - देवगुरु बृहस्पती वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ करतील. वर्ष 2026 मध्ये या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही बचत करून गुंतवणूक कराल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. थांबलेली कामे पूर्ण होतील. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने जीवनाला नवी दिशा मिळेल. तुमची लोकप्रियता आणि मान-सन्मान वाढेल.
advertisement
4/7
मिथुन - गुरू ग्रह मिथुन राशीत राहून या राशीच्या लोकांचे भाग्य चमकवतील. तुमचे पद आणि प्रभाव वाढेल. तुम्ही स्वतःला सुरक्षित आणि भाग्यवान अनुभवाल, धनलाभ होईल. बऱ्याच काळापासून थांबलेली पदोन्नती मिळू शकते. नवीन संधी मिळतील.
advertisement
5/7
कन्या - गुरू ग्रह कन्या राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात प्रगती करण्याची संधी देतील. व्यावसायिक लोक आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकतात. संतती सुख मिळेल. जीवनात धन-समृद्धी वाढेल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. मान-सन्मान वाढेल.
advertisement
6/7
वृश्चिक - वर्ष 2026 च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल येऊ शकतात. आर्थिक स्थिती भक्कम होईल. मात्र, खर्चही जास्त होईल. पण नियोजन बनवून चालल्यास तुम्हाला बचत करण्यात यश मिळेल. घर-परिवारात आनंद राहील. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते.
advertisement
7/7
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांना वर्ष 2026 मध्ये गुरू सकारात्मक फळ देतील. आर्थिक प्रगती होईल. जीवनात सुख आणि शांततेचा आनंद घ्याल. दिवस आरामात जातील. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. व्यावसायिक लोक नवीन योजनेवर काम करून लाभ मिळवू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: वर्ष 2026 मध्ये 6 महिने या राशींवर धनवर्षा-प्रमोशन! गुरूच्या राशीपरिवर्तनाने आयुष्य सेट