Monthly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे मासिक राशीफळ; फेब्रुवारीत काळजी मिटणार, आर्थिक लाभ पण..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Monthly Horoscope: फेब्रुवारी महिन्यात ज्योतिषीय घटनांचा राशीचक्रावर प्रभाव दिसेल. 06 फेब्रुवारी रोजी सूर्य धनिष्ठा नक्षत्रात, 07 फेब्रुवारी रोजी बुध शतभिषा नक्षत्रात आणि 11 फेब्रुवारी रोजी शुक्र शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी सूर्य देखील कुंभ राशीत प्रवेश करेल, त्यानं बुधादित्य आणि शुक्रादित्य यांच्यासह चतुर्ग्रही योग तयार होत आहे. यासोबतच 15 फेब्रुवारी रोजी मंगळ धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल आणि बुध पूर्वभाद्रपदात प्रवेश करेल. 22 फेब्रुवारी रोजी शुक्र पूर्वभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल आणि शनि उत्तरभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या पदात प्रवेश करेल. 23 फेब्रुवारी रोजी मंगळ देखील कुंभ राशीत प्रवेश करेल. फेब्रुवारीच्या शेवटी बुध कुंभ राशीतच वक्री होईल. याशिवाय केतू सिंह राशीत राहील आणि शनि मीन राशीत राहील. फेब्रुवारी महिन्याभरातील एकंदरीत ग्रहस्थितीनुसार सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे मासिक राशीफळ जाणून घेऊया.
advertisement
1/7

सिंह - सिंह राशीच्या लोकांनी या महिन्यात आपले आरोग्य आणि नातेसंबंध यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुमचे बोलणे तुमचे काम बनवू शकते किंवा बिघडवू शकते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कामाच्या ठिकाणी किंवा घरी सर्वांशी नम्रतेने वागा; अहंकारापोटी कोणाचाही अपमान करू नका. नोकरी आणि व्यवसायासाठी काळ प्रगतीचा असला तरी विनाकारण वादात पडणे टाळा. या महिन्यात इतरांच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करणे महागात पडू शकते, अगदी कायदेशीर अडचणींनाही सामोरे जावे लागू शकते.
advertisement
2/7
सिंह राशीच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी एकाग्रतेवर भर द्यावा. आरोग्याच्या बाबतीत मोसमी आजार किंवा जुने विकार पुन्हा डोके वर काढू शकतात, त्यामुळे सतर्क राहा. महिन्याच्या शेवटी मित्रांच्या मदतीने प्रलंबित कामे मार्गी लागतील. कठीण प्रसंगात जोडीदार सावलीसारखा तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुम्हाला मानसिक आधार देईल.
advertisement
3/7
कन्या - कन्या राशीसाठी फेब्रुवारी महिना अत्यंत शुभ आणि सुखदायक असेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही सुखसोयींच्या वस्तूंवर मोठा खर्च कराल. जर तुम्ही वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमची ही इच्छा या महिन्यात पूर्ण होऊ शकते. तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतील, पण त्याच वेळी खर्चही वाढल्याने बजेट थोडे कोलमडू शकते. व्यापार आणि व्यवसायात गुंतलेल्या लोकांसाठी हा काळ सुवर्णसंधींचा असेल; नवीन करार होऊन व्यवसायाचा विस्तार होईल. परदेशात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा महिना भाग्यवान ठरेल.
advertisement
4/7
कन्या राशीच्या लोकांना सरकारी कामात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याने प्रलंबित कामे पूर्ण होतील. मुलांच्या प्रगतीमुळे समाजात तुमचा मान वाढेल. प्रवासाचे योग आहेत जे आनंददायी आणि फलदायी ठरतील. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे; जोडीदाराकडून एखादी सरप्राईज भेट मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखी राहील, फक्त आईच्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.
advertisement
5/7
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ-उतारांचा असेल. तुम्हाला एकाच वेळी आनंद आणि चिंता अशा दोन्ही गोष्टींचा अनुभव येईल. करिअरमध्ये सुरुवातीला प्रगती होईल, पण दुसऱ्या आठवड्यात काही अडथळे आल्यामुळे तुम्ही काळजीत पडाल. कौटुंबिक वादांमुळे मानसिक तणाव वाढू शकतो, अशा वेळी छोटी गोष्ट मोठी होणार नाही याची काळजी घ्या. नवीन मित्र बनवताना जुन्या मित्रांशी असलेले नाते जपा. कमिशन किंवा करारावर आधारित काम करणाऱ्या लोकांसाठी महिन्याचा मधला काळ खूप चांगला असेल. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यात अधिक सक्रिय व्हाल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रेमसंबंधात आकर्षणाची भावना वाढेल आणि जुन्या ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. एकमेकांवरील विश्वास वाढल्याने नाते अधिक मजबूत होईल. वैवाहिक जीवनात छोट्या तक्रारी सोडल्या तर एकंदरीत शांतता राहील. आरोग्याच्या बाबतीत महिन्याच्या उत्तरार्धात स्वतःची निगा राखा.
advertisement
6/7
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीची सुरुवात थोडी आव्हानात्मक असू शकते. कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट आणि मेहनत घ्यावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल आणि व्यवसायात स्पर्धकांकडून कडवे आव्हान मिळेल. करिअरबाबत चाचपणी करणाऱ्यांना थोडे अधिक वाट पाहावी लागेल, परंतु दुसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने वळण्यास सुरुवात होईल. पगारदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील, तर व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळेल.
advertisement
7/7
वृश्चिक - स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना एखादी सुखद वार्ता मिळेल. महिन्याच्या मध्यात सरकारी यंत्रणेकडून लाभ मिळण्याचे योग आहेत. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात अधिक रस घ्याल. कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटी मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून आर्थिक लाभ होतील. प्रेमसंबंधात आणि वैवाहिक जीवनात ताळमेळ उत्तम राहील आणि जोडीदारासोबत सुखद वेळ घालवाल. आरोग्याच्या बाबतीत आहार आणि व्यायामाची शिस्त पाळा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Monthly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे मासिक राशीफळ; फेब्रुवारीत काळजी मिटणार, आर्थिक लाभ पण..