TRENDING:

Astrology खडतर काळ भूतकाळात जमा! नोव्हेंबरपासून या 5 राशींचे दिवस पालटणार; शनी-बुधाचा वरदहस्त

Last Updated:
Astrology November Horoscope: राशीचक्रात एका ठराविक कालावधीनंतर ग्रहांचं भ्रमण होत असतं. प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत त्याच्या गोचर काळानंतर प्रवेश करत असतो. नोव्हेंबर 2024 मध्ये एक दोन नव्हे तर तब्बल चार ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. या सर्वांचा 5 राशींना खूपच फायदा होणार आहे. 
advertisement
1/8
खडतर काळ भूतकाळात जमा! नोव्हेंबरपासून या 5 राशींचे दिवस पालटणार; शनी-बुध शुभ
नोव्हेंबर महिना 5 राशींच्या व्यक्तींसाठी खूपच खास ठरणार आहे. या राशींच्या व्यक्तींना नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यापासून लाभ मिळणे सुरू होईल. या महिन्यात सर्वात प्रथम शुक्र ग्रहाचं संक्रमण होईल. हा ग्रह धनू राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2024 ला शनि कुंभ राशीत प्रवेश करेल.
advertisement
2/8
16 नोव्हेंबर 2024 ला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून तो या राशीत 16 डिसेंबर 2024 पर्यंत राहील. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2024 ला बुध ग्रहाचं संक्रमण होईल. नोव्हेंबर महिन्यातील शुक्र, शनी, सूर्य व बुध या ग्रहांचं भ्रमण पाच राशींसाठी खूपच शुभ असणार आहे. या राशींच्या व्यक्तींना पुढील दोन महिने लाभदायक ठरतील.
advertisement
3/8
वृषभ - राशीच्या व्यक्तींसाठी नोव्हेंबरपासून पुढील दोन महिने खूप चांगले आहेत. भरपूर पैसे मिळतील. विश्रांतीसाठी वेळ मिळेल. नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसाय चांगला चालेल. तुमचं ध्येय सहज साध्य होईल. आरोग्य चांगले राहील. समस्या दूर होतील.
advertisement
4/8
कर्क - कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आनंदाचा आहे. पैसा मिळेल, प्रगती साधली जाईल. यश प्राप्त होईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत तुम्हाला मिळणाऱ्या यशाचा आनंद साजरा कराल.
advertisement
5/8
तूळ - राशीच्या व्यक्तींसाठी पुढील दोन महिने खूप लाभदायक राहतील. इंटरव्ह्युमध्ये यश मिळेल. नोकरी बदलण्याचे स्वप्न पूर्ण होईल. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. अविवाहितांचे लग्न जुळण्याचा योग आहे.
advertisement
6/8
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी पुढील दोन महिने आर्थिकदृष्ट्या उत्तम राहतील. उत्पन्न वाढेल. नशीब तुमच्या बाजूने राहील. सण-उत्सव आनंदात व उत्साहात साजरे कराल. सहलीला जाण्याची संधी मिळेल. व्यावसायिक व्यक्ती नवीन उंची गाठतील.
advertisement
7/8
कुंभ - कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू होत आहे. करिअरमध्ये अपेक्षित बदल घडतील. वेळप्रसंगी तुम्ही कठोर निर्णय घेऊ शकता. तुमच्या यशाचं नवं पर्व सुरू होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा पूर्ण होईल.
advertisement
8/8
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर 2024 मध्ये न्यायदेवता शनी ग्रहासह अनेक महत्त्वाच्या ग्रहांचं भ्रमण होत आहे. त्यामुळे काही राशींना खूपच लाभ होणार आहे. अर्थात यावर कितपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology खडतर काळ भूतकाळात जमा! नोव्हेंबरपासून या 5 राशींचे दिवस पालटणार; शनी-बुधाचा वरदहस्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल