Astrology: 20 डिसेंबरला सकाळी 07:12 पासून रेड अलर्ट; ज्वालामुखी योगात 4 राशींवर आभाळ कोसळणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: ग्रहांचे राशीपरिवर्तन होत राहते, त्यातून काही शुभ-अशुभ योग तयार होतात. ज्योतिषशास्त्रामध्ये ज्वालामुखी योग हा अत्यंत अशुभ मानला जातो. हा योग काही विशिष्ट तिथी आणि नक्षत्रांच्या संयोगातून तयार होतो. दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी प्रतिपदा तिथी आणि मूळ नक्षत्राचा मेळ बसत आहे, त्यामुळे या दिवशी हा योग तयार होईल.
advertisement
1/6

या योगाच्या काळात शुभ आणि मांगलिक गोष्टी करू नयेत. या योगात कोणतंही शुभ काम सुरू केल्यास अशुभ फळं मिळतात. जाणून घेऊया 20 डिसेंबरला तयार होणारा हा ज्वालामुखी योग कोणत्या राशींसाठी धोकादायक ठरू शकतो.
advertisement
2/6
ज्वालामुखी योग 20 डिसेंबरच्या सकाळी 07:12 पासून ते उशिरा रात्री 01:21 वाजेपर्यंत असेल. या योगामुळं कोणत्या राशींना धोका निर्माण होऊ शकतो आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल ते पाहूया.
advertisement
3/6
ज्वालामुखी योग मेष राशीच्या लोकांसाठी त्रासाचा ठरू शकतो. याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. या काळात एखाद्या मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते आणि धनहानी होण्याचेही योग आहेत. तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सावध राहावं लागेल. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं टाळा.
advertisement
4/6
मिथुन राशीच्या लोकांसाठीसुद्धा हा योग धोक्याचा वाटत आहे. तुमची आर्थिक स्थिती खालावू शकते. वाहन अपघाताची भीती असल्यानं सतर्क राहा, आपलं मन शांत ठेवा. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या वाढू शकतात. वैवाहिक आयुष्यात सुद्धा मोठ्या बदलांचे संकेत आहेत. आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याचा आहे.
advertisement
5/6
तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग चांगले संकेत देत नाहीये. तुमची आर्थिक स्थिती अचानक खराब होऊ शकते. खर्चात वाढ होण्याचेही संकेत मिळत आहेत. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या आणि कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
advertisement
6/6
कुंभ राशीच्या लोकांना ज्वालामुखी योग खूप त्रास देऊ शकतो. नोकरीमध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. या काळात कोणतंही काम खूप जपून करावं लागेल अन्यथा नुकसान होऊ शकतं. कोणाशीही वाद किंवा भांडण करणं टाळा. आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे विनाकारण पैसा खर्च करू नका.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: 20 डिसेंबरला सकाळी 07:12 पासून रेड अलर्ट; ज्वालामुखी योगात 4 राशींवर आभाळ कोसळणार