Mangal Gochar 2026: गळ्यात अनपेक्षित माळ पडणार! 4 राशींचे आयुष्य बदलण्याचे योग, मंगळाचा चमत्कार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mangal Gochar February 2026 Horoscope: फेब्रुवारी महिना लवकरच सुरू होत असून दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी मंगळ ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कृती, उत्साह आणि महत्त्वाकांक्षेचा कारक असलेला मंगळ दूरदृष्टी असलेल्या कुंभ राशीत जातो, तेव्हा एकूणच उर्जेमध्ये मोठा बदल होतो. कुंभ राशीतील मंगळ जुन्या नियमांना मानण्याऐवजी ते मोडून काहीतरी नवीन आणि उत्तम करण्यावर भर देतो.
advertisement
1/7

मंगळाचे हे गोचर विशेष असण्याचे कारण म्हणजे मोठ्या सूर्यग्रहणाच्या ठीक 24 तास आधी ही घटना घडत आहे. याचा सकारात्मक परिणाम सर्वच राशींवर होईल, परंतु 4 राशींना नशिबाची साथ आणि यश मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. कुंभ राशीतील मंगळ गोचराचा राशींवर होणारा शुभ प्रभाव याविषयी ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी दिलेली माहिती पाहुया.
advertisement
2/7
मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ हा राशीचा स्वामी आहे, त्यामुळे या बदलाचा परिणाम आपल्या मेष राशीला सर्वाधिक जाणवेल. कुंभ राशीतील मंगळाचे भ्रमण तुमच्या लाभ आणि जनसंपर्काच्या 11 व्या स्थानात होत आहे. मंगळासाठी हे अत्यंत शुभ स्थान मानले जाते. या काळात तुमचे सामाजिक वर्तुळ अशा प्रकारे वाढेल ज्याचा थेट फायदा तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि दीर्घकालीन स्वप्नांवर होईल.
advertisement
3/7
मेष राशीच्या लोकांना यामुळे एखाद्या मोठ्या समूहासोबत काम करण्याची संधी मिळेल किंवा एखादा सामाजिक प्रकल्प यशस्वी होईल. जर तुम्ही मार्गदर्शक किंवा तुमच्या विचारांसाठी व्यासपीठ शोधत असाल, तर हा काळ उत्तम आहे.
advertisement
4/7
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ भाग्य, प्रवास आणि उच्च ज्ञानाच्या स्थानातून त्रिकोण योग बनवत आहे. तुम्ही ज्या संधीची वाट पाहत होता, तीच ही वेळ आहे. तुम्हाला तुमचे ज्ञान वाढवण्याची किंवा अचानक प्रवासाची तीव्र इच्छा होईल. हे गोचर मानसिक संभ्रम दूर करून ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल. तुम्हाला करिअर किंवा शिक्षणात अडथळा जाणवत असेल, तर कुंभ राशीतील मंगळ तुम्हाला स्पर्धेत पुढे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग दाखवेल. एखादी बौद्धिक जोखीम स्वीकारल्यास नशिबाची साथ नक्कीच मिळेल.
advertisement
5/7
तूळ - मंगळ ग्रह सध्या तूळ राशीच्या प्रेम, सर्जनशीलता आणि आत्म-अभिव्यक्तीच्या 5 व्या स्थानाला सक्रिय करत आहे. ही राशी सहसा संतुलन आणि शांतीला प्राधान्य देते, परंतु हे गोचर तुम्हाला थोडे अधिक उत्साही आणि धाडसी बनवेल. तुमची सर्जनशीलता उच्च स्तरावर असेल. तुम्हाला एखादा नवीन छंद किंवा आवडीच्या विषयात रस निर्माण होईल, ज्यामुळे मनाला छान वाटेल. तुम्ही कला किंवा निर्मिती क्षेत्रात असाल, तर यश मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. सुरक्षित खेळी करण्याऐवजी चौकटीबाहेरचा विचार करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल.
advertisement
6/7
कुंभ - मंगळाचे भ्रमण तुमच्याच राशीतून म्हणजेच पहिल्या स्थानातून होत आहे, त्यामुळे सर्व लक्ष तुमच्यावर असेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी हे गोचर मनाला नवी ऊर्जा देणाऱ्या टॉनिकसारखे काम करेल. तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही फक्त विचार करण्यातच अडकले आहात, तर तो काळ आता संपला आहे.
advertisement
7/7
मंगळ कुंभ राशीच्या लोकांना शारीरिक शक्ती आणि लोकांच्या परवाची चिंता न करण्याची वृत्ती देईल. स्वतःचे नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी ही योग्य वेळ आहे. लोक तुमच्यातील जिद्द आणि वेगळेपणाची दखल घेतील. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, तुमची उर्जा वादात खर्च करण्याऐवजी ध्येय गाठण्यासाठी वापरा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mangal Gochar 2026: गळ्यात अनपेक्षित माळ पडणार! 4 राशींचे आयुष्य बदलण्याचे योग, मंगळाचा चमत्कार