TRENDING:

Money Mantra: रविवारी सूर्य कृपा! या 5 राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ; अडकलेले पैसे मिळणार

Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं रविवारच्या दिवसाचं (22 सप्टेंबर 2024) राशीभविष्य.
advertisement
1/12
रविवारी सूर्य कृपा! या 5 राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ; अडकलेले पैसे मिळणार
मेष (Aries) : तुमच्या गरजा पूर्ण होतील. व्यावसायिकांना रोख रकमेची कमतरता भासू शकते. कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. सासरकडील व्यक्तींकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे.उपाय : पिंपळाच्या झाडाखाली पाच दिवे लावावे.
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : व्यवसायासंदर्भात प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. रखडलेला सौदा मित्रांच्या मदतीने पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पार्टीच्या मूडमध्ये असाल. बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आज कर्ज घेणं टाळा. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल.उपाय : लाल किंवा हिरव्या चंदनाचा टिळा कपाळावर लावावा.
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : नशिबाची साथ मिळेल. रखडलेला सौदा पूर्ण होऊ शकतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला मानसन्मान मिळेल. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा.उपाय : अक्षता पाण्यात मिसळून अर्घ्य द्यावे. मीठ विरहित भोजन करावे.
advertisement
4/12
कर्क (Cancer) : रोजच्या गरजा भागवण्यासाठी पैसे खर्च कराल. पण खर्च करताना बजेटचा विचार करावा लागेल. उत्पन्न आणि खर्चात समतोल ठेवा. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात.उपाय : गूळ आणि तांदूळ एकत्र करून वाहत्या पाण्यात प्रवाहित करा.
advertisement
5/12
सिंह (Leo) : विद्यार्थ्यांना पैशांची कमतरता भासू शकते. व्यवसायाला गती देण्यासाठी थोडी धावपळ करावी लागेल. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते.उपाय : सूर्याला अर्घ्य द्या. सूर्य गायत्री मंत्राचा जप करा.
advertisement
6/12
कन्या (Virgo) : नशीब उजळेल. सकाळपासून चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. नोकरीत मान मिळेल. पण सरकारी नोकरदारांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे त्यांनी सावध राहा.उपाय : पिठाचा लहान गोळा करून माशांना खायला द्या.
advertisement
7/12
तूळ (Libra) : पैशांबाबत दिवस चांगला आहे. व्यवसायात नवीन सौदे मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. त्यामुळे भविष्याविषयी चिंता कमी होईल. रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल.उपाय : पाण्यात दूध मिसळून ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करा.
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : नशिबाची साथ मिळेल. नोकरदारांवर कामाचा ताण वाढू शकतो. पण मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर संध्याकाळपर्यंत सर्व कामं पूर्ण कराल. भागीदारीत व्यवसाय केला तर त्यात तुम्हाला नफा होऊ शकतो.उपाय : तांब्याच्या भांड्यात जास्वंदाचं फूल टाकून अर्घ्य द्या.
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : व्यवसायासाठी कर्ज घेणार असाल तर ते विचारपूर्वक घ्या. कारण कर्जाची परतफेड करणं कठीण होऊ शकतं. अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला भावाचा सल्ला उपयुक्त ठरेल.उपाय : गायीला हिरवा चारा खायला द्या. लक्ष्मी मातेची पूजा करा.
advertisement
10/12
मकर (Capricorn) : रोजगारासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तींना रोजगाराच्या नवीन संधी मिळू शकतात. सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल. सर्व कामं पूर्ण होतील. तुम्हाला आवडणारं काम करण्याचा विचार करा. व्यवसायासाठी गरज पडल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.उपाय : आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. गहू आणि गूळ लाल कापडात बांधून दान करा.
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : व्यवसायात गरज पडली तर जोखीम घेऊ शकता. त्यामुळे भविष्यात फायदा होईल. कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात.उपाय : सूर्य चालिसाचा पाठ करा. गरजुंना मदत करा.
advertisement
12/12
मीन (Pisces) : व्यवसायातील शत्रूंवर बारीक लक्ष ठेवा. कारण ते तुमचं नुकसान करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमच्यासमोर आलेली कोणतीही ऑफऱ स्वीकारू नका. मालमत्तेशी निगडीत सुरू असलेले प्रकरण संपुष्टात येईल. पण यासाठी तुम्हाला वडिलांचा सल्ला घेण्याची आवश्यकता भासेल.उपाय : सूर्याला अर्घ्य द्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Money Mantra: रविवारी सूर्य कृपा! या 5 राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ; अडकलेले पैसे मिळणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल