TRENDING:

Money Mantra: सोमवारी भाग्य उजळणार! या राशी फायद्यात राहणार, चांगली बातमी खुश करणार

Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं सोमवारच्या दिवसाचं (23 सप्टेंबर 2024) राशीभविष्य.
advertisement
1/12
सोमवारी भाग्य उजळणार! या राशी फायद्यात राहणार, चांगली बातमी खुश करणार
मेष (Aries) : नोकरी-व्यवसाय उत्तम राहील. नोकरीमध्ये आर्थिक लाभ होईल, तसंच व्यवसायातही नफा मिळवून देणारी परिस्थिती असेल. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. वडिलांच्या कामामध्ये तुम्ही केलेल्या सहकार्याचं कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना तुमच्याबाबत असूया वाटेल.उपाय : श्री गणेशाची आराधना करा.
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : तुमच्याकडे असलेली कौशल्य आणि समजूतदारपणामुळे तुम्ही दिलेले टास्क खूप चांगल्या पद्धतीनं पूर्ण कराल. आज व्यवसायात अनपेक्षितपणे एखादी चांगली बातमी मिळेल. अधिकाऱ्यांसमोर तुमचा मुद्दा मांडायची ही योग्य वेळ असेल.उपाय : भगवान विष्णूंची उपासना करा.
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. महिलांनी त्यांच्या करिअरबाबत सखोलपणे विचार करणं गरजेचं आहे. मालमत्ता खरेदी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. पैशांच्या व्यवहाराबाबत आज सावध राहा.उपाय : हनुमान चालिसाचं पठण करा.
advertisement
4/12
कर्क (Cancer) : कापड व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळू शकतो. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. नोकरीतही आज यश मिळेल. कोणत्याही जबाबदारीच्या कामाकडे आज दुर्लक्ष करू नका.उपाय : श्रीकृष्णांची आराधना करा.
advertisement
5/12
सिंह (Leo) : नोकरदारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे. व्यवसायात चांगले परिणाम दिसून येतील. कामासंदर्भात केलेल्या प्रयत्नांचं चांगलं फळ मिळेल. कामामध्ये एखाद्याबरोबर असण्यामुळे तुम्हाला चांगला नफा कमवता येईल. कामाबाबतच्या योजना तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार पूर्ण करता येतील.उपाय : पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.
advertisement
6/12
कन्या (Virgo) : जोडीदाराच्या मदतीने तुम्ही मालमत्तेच्या व्यवहारात लक्ष घालाल. तुमच्या वेळेचा योग्यप्रकारे उपयोग करून तुम्ही फायदा मिळवू शकाल. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात आज विशेष परिणाम साधलेले दिसून येतील. त्यातून थोडा नफा होईल. मात्र खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा.उपाय : मारूतीची उपासना करा.
advertisement
7/12
तूळ (Libra) : तुमच्या कौटुंबिक व्यवसायात आज तुम्हाला जोडादाराचं ऐकावं लागू शकतं. व्यावसायिकांच्या कामांत सरकारी नियमांमुळे काही अडचणी येऊ शकतात. नोकरदारांना काही आव्हानांना तोंड द्यावं लागेल.उपाय : पिवळ्या वस्तू दान करा.
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : अज्ञात स्रोताकडून आज पैसे मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्पावर काम करून तुम्हाला भरपूर शिकायला मिळेल. वडिलधाऱ्यांबरोबर खरेदीसाठी जाण्याचे योग आहेत.उपाय : श्री गणेशाची आराधना करा.
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : बँकिंग क्षेत्रातल्या लोकांना आज नफा मिळू शकतो. मालमत्तेविषयीचा एखादा व्यवहार प्रलंबित असेल तर तो आता फायदेशीर वाटू शकतो. त्यामुळे आर्थिक बळ मिळेल.उपाय : गरजू व्यक्तींना मदत करा.
advertisement
10/12
मकर (Capricorn) : आज कामात रस वाटेल. तुमच्या पराक्रमाच्या आणि धैर्याच्या जोरावर पैसे मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तरुणांना करिअरसंदर्भात नवी माहिती मिळेल.उपाय : योगसाधना व प्राणायाम करा.
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : नोकरीमध्ये तुमचं वरिष्ठांकडून कौतुक होईल. बढतीही मिळू शकते. ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळेल.उपाय : सूर्याला अर्घ्य द्या.
advertisement
12/12
मीन (Pisces) : व्यवसायात अधिक नफा मिळवण्यासाठी भावंडांचं सहकार्य घेऊ शकता. मित्रमंडळींच्या मदतीने तुम्ही अवघड कामंही सहजतेनं पूर्ण कराल. महिलांना गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करावी लागेल.उपाय : वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या आणि श्री गणेशाची आराधना करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Money Mantra: सोमवारी भाग्य उजळणार! या राशी फायद्यात राहणार, चांगली बातमी खुश करणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल