TRENDING:

Numerology: नशीबवानच! माहेर असो की सासर, सगळीकडे राणीसारखं जीवन जगतात या मूलांकाच्या स्त्रिया

Last Updated:
Numerology: अंकशास्त्रानुसार, विशिष्ट मूलांक असलेल्या लोकांना नशीब-भाग्याची साथ आणि सुविधा इतरांच्या पेक्षा चांगल्या मिळतात. आज आपण अंकशास्त्रानुसार नशीब स्त्रियांच्या विषयी जाणून घेणार आहोत. यामध्ये मूलांक 6 सर्वात वरती येतो. मूलांक 6 असलेल्या स्त्रियांना जीवनात विलासिता आणि यश मिळत राहते. 
advertisement
1/5
नशीबवान! माहेर असो की सासर, सगळीकडे राणीसारखं जीवन जगतात या मूलांकाच्या स्त्रिया
मूलांक 6 असलेल्या व्यक्ती दिसायला सुंदर, आकर्षक आणि कलाप्रेमी असतात. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात एक प्रकारची नम्रता असते, ज्यामुळे लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात. या मूलांकाच्या लोकांना कला, संगीत, नृत्य, आणि सजावटीची विशेष आवड असते. कलात्मक कामांमध्ये ही लोकंखूप यशस्वी होऊ शकतात.
advertisement
2/5
ज्या मुलींचा-महिलांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झालेला असतो त्यांचा मूलांक 6 असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह शुक्र असतो. शुक्र ग्रह हा संपत्ती, सौंदर्य, विलासिता आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे मूलांक 6 असलेल्या मुलींच्या आयुष्यात भौतिक सुखसोयी आणि आर्थिक स्थिरतेची कमतरता नसते. या मुलींना जीवनात सुख मिळतं, त्या कुठेही राहिल्या तरी राणीसारखे जीवन जगतात. 
advertisement
3/5
स्वभाव - मूलांक 6 असलेल्या मुली स्वभावाने खूप आनंदी आणि मिलनसार असतात. त्यांना नवीन लोकांशी मैत्री करायला, कनेक्ट व्हायला आवडतं. लोकांमध्ये सहज कसं मिसळायचं हे त्यांना चांगलं ठाऊक असतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक नैसर्गिक आकर्षण आणि एक विशेष करिष्मा असतो, तोच लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करतो.
advertisement
4/5
नात्यात निष्ठावान - या मुलींना नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि निष्ठा आवडते. त्या त्यांच्या जोडीदाराला पूर्णपणे साथ देतात. नशिबाची साथ असल्यानं पैसा कमावण्यातही पुढे राहतात. त्यांचे नाते दृढ आणि आनंदी ठेवण्यासाठी त्या शक्य तितके प्रयत्न करतात.
advertisement
5/5
करिअर क्षेत्र - मूलांक 6 असलेल्या मुलींमध्ये छंद आणि आवडी करिअरमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता असते. त्या कला आणि डिझाइन, फॅशन, सौंदर्य, कार्यक्रम व्यवस्थापन, मार्केटिंग यासारख्या सर्जनशील क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात. याशिवाय, त्या शिक्षण, समाजसेवा, मनोरंजन, मीडिया, पर्यटन आणि व्यवसाय यासारख्या क्षेत्रातही यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: नशीबवानच! माहेर असो की सासर, सगळीकडे राणीसारखं जीवन जगतात या मूलांकाच्या स्त्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल