Weekly Horoscope: 19 जानेवारीपासून सुरू होणारा आठवडा कोणासाठी कसा? मेष ते मीन साप्ताहिक राशीफळ
- Written by:Chirag Daruwalla
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Rashifal, 19 to 25 January 2026: नवीन आठवडा कोणासाठी कसा असेल, कुंडलीमध्ये, तुमचे कौटुंबिक जीवन, आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि कामाची परिस्थिती या आठवड्यात कशी असेल, या आठवड्यात तुम्हाला काय मिळेल, तुमच्यासाठी काय फायदेशीर ठरेल, अडचणी टाळण्यासाठी तुम्ही कोणती खबरदारी घ्यावी जाणून घ्या. मेष ते मीन राशी सर्व 12 राशींसाठी जानेवारीचा हा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.
advertisement
1/12

मेष राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात आत्मविश्वासाने होईल, मात्र साहसी वृत्तीत काहीशी घट जाणवू शकते. तुमचे अधिकारी तुम्हाला कामात सहकार्य करतील, पण सहकाऱ्यांशी एखाद्या विषयावरून मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा उत्तम असून अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवनात मात्र काही चढ-उतार येण्याची शक्यता आहे, त्यामुळे जोडीदारासोबत बोलताना संयम ठेवा.
advertisement
2/12
वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात या आठवड्यात अनेक सकारात्मक बदल होतील. नोकरीमध्ये तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे तुम्ही सर्वांना प्रभावित कराल आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभेल. प्रलंबित असलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करण्याचा विचार करू शकतात. जोडीदाराचे प्रत्येक वळणावर सहकार्य मिळेल आणि सासरच्या लोकांशी संबंध सुधारतील. छोट्या प्रवासाचे योगही या काळात दिसून येत आहेत.
advertisement
3/12
मिथुन राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात काहीशी गोंधळाची असू शकते. नशिबाची साथ कमी मिळाल्यामुळे काही कामे अपूर्ण राहतील. शरीरातील आळसामुळे कामात व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे आळस झटकून कामाला लागा. कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक ताण जाणवेल. मौजमजेच्या वस्तूंवर अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात वाहन चालवताना विशेष काळजी घ्या, कारण अपघाताची किंवा दुखापत होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/12
कर्क राशीच्या लोकांच्या मनात या आठवड्यात विचारांचे काहूर माजलेले असेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. मालमत्तेशी संबंधित कामात अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे तुमची धावपळ वाया जाण्याची भीती आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात अधिक परिश्रमांची गरज आहे. मुलांच्या आरोग्याबाबत काही तक्रारी उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्हाला दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागतील.
advertisement
5/12
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला असेल. ग्रहांच्या शुभ युतीमुळे तुम्हाला अनेक नवीन यश आणि उपलब्धी मिळतील. आर्थिक बाजू मजबूत होईल आणि उत्पन्नाची साधने वाढतील. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या ठिकाणाहून ऑफर मिळू शकतात. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. तुम्ही जोडीदारासोबत नवीन मालमत्ता खरेदी करू शकता किंवा घराचे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करू शकता.
advertisement
6/12
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनेक अर्थांनी फायदेशीर ठरेल. अडकलेले पैसे परत मिळाल्याने तुमची आर्थिक चिंता दूर होईल. घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. घरातील आवश्यक वस्तूंवर तुम्ही खर्च कराल. आर्थिक लाभासाठी ही वेळ अनुकूल आहे आणि कौटुंबिक जीवनातही मधुरता राहील.
advertisement
7/12
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा धनलाभाचे उत्तम संकेत देत आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन तुम्हाला उत्साही वाटेल. जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यांना नवीन कामात चांगला नफा मिळेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ खूप यशस्वी राहील.
advertisement
8/12
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम राहील. काही बाबतीत यश मिळेल तर काही ठिकाणी निराशा पदरी पडू शकते. थंडी आणि प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च झाल्यामुळे आर्थिक ओढाताण होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी एखाद्या कामासाठी प्रवास करावा लागेल आणि मानसिक तणाव जाणवेल.
advertisement
9/12
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत फायदेशीर असेल. नोकरी आणि व्यवसायातील लोकांना अपेक्षित यश मिळाल्यामुळे आनंद होईल. मात्र, व्यापाऱ्यांनी उधारीवर माल देणे टाळावे, अन्यथा नुकसान होऊ शकते. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि वादातून सुटका होईल. विद्यार्थ्यांना सुखद बातम्या मिळतील. अचानक होणारा धनलाभ तुमच्या उत्साहात भर घालेल.
advertisement
10/12
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ चढ-उतारांचा असेल. वाढत्या खर्चामुळे कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कामात मन न लागल्यामुळे नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांचे मन घरगुती कामांमुळे अभ्यासावरून विचलित होईल. थंडीमुळे आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. वादांपासून लांब राहा, अन्यथा कायदेशीर बाबींमध्ये किंवा कोर्टाच्या कामात अडकण्याची भीती आहे.
advertisement
11/12
कुंभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी विशेष सावधगिरी बाळगावी. साडेसातीचा प्रभाव असल्याने मनात चिंता उत्पन्न होऊ शकतात, पण नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. ऑफिसमध्ये वरिष्ठांशी वाद घालणे टाळा. आपल्या वाणीवर म्हणजेच बोलण्यावर संयम ठेवा, कारण तुमच्या बोलण्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement
12/12
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र असेल. काही रखडलेली कामे पुन्हा सुरू झाल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. कुटुंबाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. धार्मिक कार्यांकडे कल वाढेल. वायफळ खर्च वाढल्यामुळे आर्थिक बजेट कोलमडू शकते, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील, पण कामाच्या व्यापामुळे चिंता कायम राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: 19 जानेवारीपासून सुरू होणारा आठवडा कोणासाठी कसा? मेष ते मीन साप्ताहिक राशीफळ