Shani Margi 2026: नोव्हेंबर टर्निंग पॉइंट! शनिकडून 3 राशीच्या लोकांना यश, पैसा, सुख सगळं काही मिळणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Margi 2026: शनिदेवाला कर्मफळदाता मानलं जातं, शनि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जर एखादा माणूस मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करतो, तर शनीच्या कृपेने त्याला यश, सन्मान आणि धन सर्व काही मिळतं. तर, जर कोणी चुकीचा मार्ग निवडतो, तर शनी देव त्याला धडा देखील शिकवतात.
advertisement
1/8

 वर्ष 2025 मध्ये शनी मार्गी होणार आहे, म्हणजे त्यांची चाल बदलणार आहे. हे परिवर्तन काही लोकांसाठी जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनी मार्गी होतात, तेव्हा अडलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि जीवनात स्थिरता येते. अनेकदा दीर्घकाळापासून सुरू असलेल्या अडचणी अचानक संपतात.
advertisement
2/8
 येणाऱ्या वर्ष 2026 मध्ये तीन राशींवर शनी देवाची विशेष कृपा बरसणार आहे. या राशीचे लोक आर्थिकदृष्ट्या भक्कम होतील शिवाय जीवनात प्रगती, पदोन्नती आणि आनंदाचे नवीन मार्ग खुले होतील. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ज्यांच्यावर शनी देवाची असीम कृपा होईल, ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून याबाबत जाणून घेऊया.
advertisement
3/8
 कर्क रास: कर्क राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष सुवर्णसंधी घेऊन येणार आहे. शनीच्या कृपेने तुमचे नशीब उघडणार आहे. गेल्या काही काळापासून जी कामे अपूर्ण राहिली होती, ती आता पूर्ण होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळू शकते. तर व्यवसाय करणाऱ्यांना नवीन प्रकल्प आणि भागीदारीच्या संधी मिळतील. जर तुम्ही परदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर 2026 मध्ये हे स्वप्न सत्य होऊ शकते. प्रेमजीवन देखील संतुलित राहील. जोडीदारासोबतचे संबंध मजबूत होतील आणि कुटुंबात आनंद वाढेल. एकंदरीत, शनीच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांचे नशीब चमकेल.
advertisement
4/8
 वृश्चिक रास: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2026 हे आर्थिक प्रगतीचे वर्ष राहील. शनी देव तुमच्या करिअरला नवीन दिशा देणार आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा होऊ शकतो. बऱ्याच काळापासून सुरू असलेली मेहनत आता रंग आणेल. नवीन करार, गुंतवणूक किंवा संयुक्त व्यवसायातून फायदा मिळेल.
advertisement
5/8
 वृश्चिक - नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हे वर्ष प्रगतीचे असेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि पदोन्नतीची संधी मिळू शकते. जर तुम्ही एखादे नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर शनीचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहील. परदेश प्रवास किंवा आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या संधी देखील निर्माण होऊ शकतात. प्रेम जीवनातही सकारात्मक बदल पाहायला मिळतील. नात्यात स्थिरता येईल आणि कुटुंबासोबतचे संबंध उत्तम होतील.
advertisement
6/8
 कुंभ रास: कुंभ राशीसाठी 2026 अत्यंत शुभ राहणार आहे. शनी देव तुमच्या राशीचेच स्वामी आहेत, त्यामुळे त्यांचे मार्गी होणे तुमच्यासाठी वरदान ठरेल. बऱ्याच काळापासून समोर आलेल्या अडचणी आता संपतील. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
7/8
 कुंभ - तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर हे वर्ष अगदी योग्य वेळ असेल. धनप्राप्तीचे अनेक मार्ग उघडतील. गुंतवणूक केल्यास फायदा होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात समन्वय राहील. जे लोक विवाहाचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठीही हे वर्ष शुभ राहील. शनीच्या कृपेने तुमच्या जीवनात स्थिरता, यश आणि सन्मान तिन्ही वाढतील.
advertisement
8/8
 कोणत्या राशींनी काळजी घ्यावी?शनिच्या स्थितीमुळे काही राशींना थोडे सावध राहावे लागेल. मेष, सिंह आणि मीन राशीच्या लोकांनी या वर्षी आपल्या निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगावी. शनीच्या वक्र दृष्टीमुळे त्यांच्या कामांमध्ये विलंब होऊ शकतो किंवा काही अडचणी येऊ शकतात. पण लक्षात ठेवा, शनी कधीही कोणाचे वाईट करत नाहीत - ते फक्त कर्मानुसार परिणाम देतात. योग्य दिशेने मेहनत केल्यास, कठीण काळ देखील तुमच्या बाजूने वळू शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Margi 2026: नोव्हेंबर टर्निंग पॉइंट! शनिकडून 3 राशीच्या लोकांना यश, पैसा, सुख सगळं काही मिळणार