TRENDING:

Astrology: 7 महिने नॉनस्टॉप पैसा-प्रगतीपथावर! कर्मफळदाता या 4 राशीच्या लोकांवर मेहरबान राहणार

Last Updated:
Astrology 2026: नवीन 2026 वर्ष कसं असेल, या वर्षात आपली स्थिती कशी असेल, ठरवलेल्या गोष्टी सगळ्या नीट होती का नाही, याची काळजीही असते. ज्योतिषशास्त्रानुसार नवे वर्ष 2026 हे शनीच्या चालीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे मानले जात आहे. यापूर्वी 28 नोव्हेंबरला शनी ग्रह मार्गी झाला आणि आता 26 जुलै 2026 पर्यंत शनी मार्गी अवस्थेतच राहणार आहेत. म्हणजेच 2026 च्या पहिल्या सात महिन्यांत शनीची चाल सरळच राहणार आहे. ज्योतिष अभ्यासकांनी मार्गी शनी चार राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ असल्याचे सांगितले आहे.
advertisement
1/5
7 महिने नॉनस्टॉप पैसा-प्रगतीपथावर! कर्मफळदाता या 4 राशीच्या लोकांवर मेहरबान
मार्गी शनिचा काही राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक आघाडीवर जबरदस्त धनलाभ मिळू शकतो. जाणून घेऊया या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
advertisement
2/5
वृषभ - शनीची सरळ चाल तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी मदत करेल. तुम्ही अनेक वर्षांपासून जे काम करण्याबद्दल विचार करत आहात, ते यशस्वीपणे पूर्ण करू शकता. ध्येय गाठण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल दिसत आहे. नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत, तर व्यापारात चांगला फायदा होऊ शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
3/5
कन्या - मार्गी शनी तुमच्या धनधान्यात अचानक वाढ करेल. पैसे कमावण्याच्या बाबतीत तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. थंडावलेले व्यवसाय आता जोमाने चालू लागतील. उद्योगात एखाद्या नवीन करारामुळे फायदा होण्याची चिन्हे आहेत. रोजगारात भरभराट होईल. सामाजिक वर्तुळ आणि मान-सन्मान वाढेल. आवडीची किंवा नवीन नोकरी मिळण्याचे योग सुद्धा आहेत.
advertisement
4/5
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी सुद्धा मार्गी शनी भाग्यवान ठरणार आहे. खर्चात घट होईल आणि पैशांची बचत होईल. कामाच्या ठिकाणी उच्च पद मिळेल आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. स्पर्धकांच्या तुलनेत तुमची कामगिरी सर्वात उत्तम राहणार आहे. या काळात कुटुंबाच्या गरजा आणि सुख-सुविधांकडे लक्ष देणे योग्य ठरेल.
advertisement
5/5
मकर - मकर राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा 2026 चा पूर्वार्ध म्हणजेच वर्षाचे पहिले सहा महिने अत्यंत शुभ ठरू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास मजबूत होईल आणि सहकाऱ्यांची भरपूर साथ मिळेल. उत्पन्नात वाढ होईल आणि पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. जखम किंवा अपघातांपासून तुमचा बचाव होईल. शत्रूंवर तुम्ही वरचढ ठराल. तुमच्या सर्जनशील कौशल्याने आणि उच्च दर्जाच्या वर्तनाने लोकांची मने जिंकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: 7 महिने नॉनस्टॉप पैसा-प्रगतीपथावर! कर्मफळदाता या 4 राशीच्या लोकांवर मेहरबान राहणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल