TRENDING:

Shani Astrology 2026: वाळवंटात गारवा! शनिची साडेसाती भोगत असलेल्या 3 राशींना आता खुशखबर, जानेवारीच्या शेवटी...

Last Updated:
Shani Astrology 2026: वर्ष 2026 मध्ये सध्या तीन राशींवर शनिची साडेसाती सुरू आहे. पण मकर राशीमध्ये चार ग्रहांच्या युती-उपस्थितीमुळे 5 मोठे राजयोग निर्माण होत आहेत. यामध्ये बुधादित्य, लक्ष्मी नारायण, शुक्रादित्य, रूचक आणि मंगलादित्य राजयोगांचा समावेश आहे. हे राजयोग साडेसातीचा त्रास कमी करून या तीन राशींना मोठा लाभ मिळवून देणार आहेत.
advertisement
1/6
वाळवंटात गारवा! शनिची साडेसाती भोगत असलेल्या 3 राशींना आता खुशखबर, महिनाखेर...
मेष राशी - मेष राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. हे पाच राजयोग तुमच्या करिअरमधील अडथळे दूर करण्यास मदत करतील. तुमच्या उत्पन्नाची साधने अधिक मजबूत होतील. जर तुमचे पैसे दीर्घकाळापासून कुठेतरी अडकले असतील, तर ते लवकरच परत मिळू शकतात. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि मुलांची अभ्यासातील एकाग्रता सुधारेल. सरकारी किंवा प्रशासकीय कामात लाभाची शक्यता आहे.
advertisement
2/6
कुंभ राशी - कुंभ राशीवर साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू असून या राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहे. साडेसातीमुळे तुम्हाला आतापर्यंत ज्या कष्टांचा सामना करावा लागला होता, ते आता अचानक दूर होऊ शकतात. या राजयोगांमुळे तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. तुम्हाला नवीन घर, वाहन किंवा मालमत्तेचे सुख मिळू शकते. धार्मिक यात्रेचे योग असून मनाला शांती लाभेल.
advertisement
3/6
मीन राशी - मीन राशीवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे, जो सर्वात आव्हानात्मक मानला जातो. मात्र, या पाच राजयोगांच्या प्रभावामुळे तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होऊ शकतो. धनधान्यात वाढ होईल आणि खर्च कमी झाल्यामुळे पैशांची बचत करणे सोपे जाईल. महत्त्वाच्या कामात मित्रांचे सहकार्य मिळेल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील आणि कुटुंबातील तणाव किंवा कटकटी संपुष्टात येऊन नात्यात गोडवा येईल.
advertisement
4/6
साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी आणि या शुभ राजयोगांचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी खालीलपैकी काही सोपे उपाय करू शकता. शनि मंत्राचा जप दररोज किंवा किमान दर शनिवारी 'ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः' किंवा 'ॐ शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे मानसिक शांती मिळते आणि शनिदेवाचा प्रकोप कमी होतो.
advertisement
5/6
हनुमान उपासना शनिच्या साडेसातीवर हनुमान चालीसाचे पठण करणे हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. दर शनिवारी हनुमानाचे दर्शन घेऊन त्यांना शेंदूर आणि तीळ अर्पण केल्यास साडेसातीची तीव्रता कमी होते.
advertisement
6/6
पिंपळाच्या झाडाची पूजा दर शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घातल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि प्रगतीतील अडथळे दूर होतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Astrology 2026: वाळवंटात गारवा! शनिची साडेसाती भोगत असलेल्या 3 राशींना आता खुशखबर, जानेवारीच्या शेवटी...
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल