TRENDING:

Astrology: 21 ऑगस्टपासून या 3 राशीचे लोक जबरदस्त कमावणार; पैसेवाला ग्रह प्रसन्न झाल्यानं चिंताच मिटेल

Last Updated:
Shukra Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रात, शुक्र हा प्रेम-आकर्षण, धन, समृद्धी, संपत्ती, वैभव इत्यादींचा कारक मानला जातो. शुक्र दर महिन्याला आपली राशी बदलतो. त्यामुळे एका राशीत परत येण्यासाठी सुमारे 1 वर्ष लागतो. शुक्राच्या स्थितीत होणारा बदल राशीचक्रावर परिणाम करतो.
advertisement
1/5
21 ऑगस्टपासून या 3 राशीचे लोक जबरदस्त कमावणार; पैसेवाला ग्रह प्रसन्न होणार
शुक्रानं 26 जुलै रोजी सकाळी 9:02 वाजता, शुक्र मिथुन राशीत प्रवेश केला आहे आणि 21 ऑगस्टपर्यंत या राशीत राहील. त्यानंतर तो कर्क राशीत प्रवेश करेल. शुक्र मित्र ग्रहाच्या राशीत आगमन झाल्यानं सुखसोयींमध्ये वाढ होईल. शुक्राने कर्क राशीत प्रवेश केल्यानं 12 राशींपैकी तीन राशींना भरपूर फायदे मिळू शकतात. या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊ.
advertisement
2/5
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र 21 ऑगस्ट रोजी पहाटे 01:25 वाजता कर्क राशीत प्रवेश करेल आणि 15 ऑगस्टपर्यंत या राशीत राहील. त्यानंतर तो सिंह राशीत प्रवेश करेल.
advertisement
3/5
मेष - शुक्र या राशीच्या दुसऱ्या आणि सातव्या घराचा स्वामी असल्यानं शुक्र कर्क राशीत प्रवेश करून चौथ्या घरात राहणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना चौथ्या घराचा पूर्ण लाभ देखील मिळू शकतो. या राशीच्या लोकांच्या अनेक दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे. जमीन आणि इमारतीचे सुखदेखील मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. यासोबतच नोकरी करणाऱ्यांना खूप फायदे मिळू शकतात. तुमचे नवीन लोकांशी संपर्क येतील, ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे थोडेसे मतभेद होण्याची शक्यता आहे. म्हणून, थोडे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
advertisement
4/5
मिथुन - या राशीत शुक्र हा पाचव्या आणि बाराव्या घराचा स्वामी आहे आणि तो कर्क राशीत संक्रमणानंतर या राशीच्या दुसऱ्या घरात येणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. सरकार आणि प्रशासनाशी संबंधित बाबींमध्येही तुम्हाला अनुकूल परिणाम मिळू शकतात. यासोबतच तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते.
advertisement
5/5
धनु - शुक्र या राशीच्या कुंडलीत सहाव्या आणि लाभ घराचा स्वामी देखील आहे आणि कर्क राशीत संक्रमणानंतर आठव्या घरात असेल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. आता तुम्ही खूप दिवसांपासून करत असलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते. उत्पन्नाचे अनेक स्रोत मिळू शकतात. काही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते त्यातूनही दिलासा मिळू शकतो. तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. कर्ज इत्यादी घेण्याचा विचार करत असाल तर या काळात तुमचा मार्ग सोपा होऊ शकतो. याशिवाय, तुम्ही कर्ज फेडण्यातही यशस्वी होऊ शकता.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: 21 ऑगस्टपासून या 3 राशीचे लोक जबरदस्त कमावणार; पैसेवाला ग्रह प्रसन्न झाल्यानं चिंताच मिटेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल