Astrology: 10 वर्षांनी चंद्राची स्वारी शुक्राच्या नक्षत्रात! दिवाळीत 3 राशींना डबल सरप्राईज मिळण्याचे योग
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करतात, ग्रहांचे राशीसोबत नक्षत्र परिवर्तन होत असते, ज्याचा परिणाम संपूर्ण राशीचक्रावर दिसून होतो.
advertisement
1/6

शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी धनाच्या दाता शुक्र ग्रह हस्त नक्षत्रात गोचर करेल. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. अशा स्थितीत शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच या राशींना अपार पैसा आणि पद-प्रतिष्ठा मिळू शकते. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.
advertisement
2/6
कर्क रास - तुमच्यासाठी शुक्र ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून तिसऱ्या भावात भ्रमण करत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ होईल. तसेच तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.
advertisement
3/6
कर्क - नोकरी करणाऱ्या लोकांना काम-धंद्यात प्रगती मिळू शकते. कुटुंबात आनंद आणि सामंजस्य वाढेल. तसेच घरात मंगल कार्य किंवा एखाद्या शुभ प्रसंगाचे आयोजन होऊ शकते. जवळच्या लोकांशी असलेले संबंध अधिक मधुर होतील. तुमची गुंतवणूक शुभ राहील.
advertisement
4/6
वृश्चिक रास - शुक्र ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ फळदायी ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून लाभ आणि उत्पन्नाच्या स्थानावर स्थित आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात जबरदस्त वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच आयात आणि निर्यातच्या कामात लाभ होईल. खाद्यपदार्थ आणि कपड्यांशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. मीडिया आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित लोकांचे काम-धंदा चांगले राहील. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून लाभ होईल.
advertisement
5/6
मीन रास - तुमच्यासाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन लाभप्रद सिद्ध होऊ शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून सातव्या भावात भ्रमण करत आहे. त्यामुळे या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन शानदार राहील. तसेच जोडीदाराची प्रगती होऊ शकते. विवाहित लोकांना संतानसुख मिळण्याचे योग तयार होत आहेत.
advertisement
6/6
मीन राशीचे जे लोक घर, वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची योजना करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत योग्य आहे. जीवनात एक नवीन स्थिरता आणि संतुलन जाणवेल. तसेच या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. भागीदारीच्या कामात तुम्हाला फायदा होऊ शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: 10 वर्षांनी चंद्राची स्वारी शुक्राच्या नक्षत्रात! दिवाळीत 3 राशींना डबल सरप्राईज मिळण्याचे योग