मराठी भाषेच्या मुद्यावर एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता राजकीय दृष्ट्याही एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. आज मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क परिसरात मनसेच्या वतीने दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थितीत होतं.