Surya Nakshatra Parivartan: शनि जयंतीच्या अगोदर दुप्पट लाभ! सूर्यदेव नक्षत्र बदलणार, फायदा 4 राशींना होणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Surya Nakshatra Parivartan: या महिन्याच्या शेवटी ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाची घडामोड होणार आहे. वैशाख अमावस्येला शनि जयंती साजरी केली जाईल, पण त्याच्या अगोदर सूर्याचे राशी परिवर्तन होणार आहे. त्याचा थेट परिणाम चार राशीच्या लोकांवर दिसून येईल. आरोग्य, पैसा, नातेसंबंध, करिअरमध्ये शुभ परिणाम दिसतील.
advertisement
1/5

शनि जयंतीच्या आधी शनिचे पिता मानल्या जाणाऱ्या सूर्याचे नक्षत्र परिवर्तन होणार आहे. या स्थितीचा शुभ परिणाम पाहून भाग्यवान राशींच्या लोकांना आनंदाचा धक्का बसू शकतो. सूर्याचे नक्षत्र परिवर्तन ठराविक काळात नंतर होत असते, सूर्याची शुभ स्थिती आयुष्यात शुभ परिणाम, तेज देते. संकटातून बाहेर आणते.
advertisement
2/5
मेष - सूर्याच्या नक्षत्रातील बदल मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायी असेल. नक्षत्रात बदल झाल्यानं सूर्य मेष राशीवर विशेष कृपा करेल. नोकरीत अनेक लाभ मिळण्याची शक्यता आहेत. कार्यक्षेत्रात चांगले बदल होऊ शकतात. मेष राशीच्या लोकांना पगार वाढीचे गिफ्ट मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना खुशखबर मिळेल.
advertisement
3/5
मिथुन - सूर्याच्या नक्षत्रात होणारा बदल मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिशय खास असेल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. जमीन, मालमत्ता आणि पैशांची गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना कष्टाचे फळ मिळू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली असेल.
advertisement
4/5
कर्क - पैसा विविध मार्गांनी कमावता येईल. सूर्याच्या नक्षत्रातील बदल आर्थिक बाबींमध्ये अतिशय खास असेल. या राशीच्या नोकरदार लोकांचे उत्पन्न देखील वाढू शकते. घरातील व्यक्तीकडून मिळालेली चांगली बातमी मनाला शांती देईल. बँक बॅलन्स वाढलेला पाहून समाधान वाटेल.
advertisement
5/5
तूळ - तूळ राशींच्या लोकांचे चांगले दिवस आले आहेत. सूर्याच्या नक्षत्रातील बदलामुळे या राशीत लोकांना विशेष फायदा मिळणार आहे. उत्पन्न वाढल्याचे समाधान असेल, आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरीत पदोन्नती, पगारवाढीची शक्यता आहे. कुटुंबाची चांगली स्थिती पाहून दिलासा मिळेल. संततीसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांना चांगली बातमी मिळू शकते. आजारपणातून दिलासा मिळू शकेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Surya Nakshatra Parivartan: शनि जयंतीच्या अगोदर दुप्पट लाभ! सूर्यदेव नक्षत्र बदलणार, फायदा 4 राशींना होणार