TRENDING:

ShaniDev: अलर्ट राहण्याची वेळ आता या राशीवर! शनिच्या साडेसातीचा पुढचा नंबर कोणाचा? टेन्शन-त्रास मागे

Last Updated:
Shani Astro: ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या शनी ग्रह मीन राशीत गोचर करत आहेत. त्यामुळे सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीचे लोक शनी साडेसातीच्या प्रभावाखाली आहेत. शनी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा एका राशीवर साडेसाती सुरू होते आणि एका राशीला साडेसातीतून मुक्ती मिळते. शनी साडेसातीचा कालावधी साडेसात वर्षांचा असतो. पुढील साडेसाती कोणत्या राशीवर सुरू होईल, त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
advertisement
1/5
अलर्ट राहण्याची वेळ आता या राशीवर! शनिच्या साडेसातीचा पुढचा नंबर कोणाचा?
शनिची साडेसाती त्रासदायक मानली जाते, अनेकांना साडेसाती म्हटलं की भीती वाटते, कारण तो आयुष्यातील खडतर काळ मानला जातो. सध्या सुरू असलेल्या राशींनंतर पुढील साडेसाती वृषभ राशीच्या लोकांवर सुरू होणार आहे.
advertisement
2/5
3 जून 2027 रोजी शनी ग्रह मेष राशीत प्रवेश करेल, तेव्हा वृषभ राशीचे लोक साडेसातीच्या प्रभावाखाली येतील. त्याचवेळी कुंभ राशीच्या लोकांना साडेसातीतून मुक्ती मिळेल. मीन राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा अंतिम (तिसरा) चरण सुरू होईल. तर मेष राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा दुसरा चरण सुरू होईल.
advertisement
3/5
शनी साडेसाती दरम्यान काय करू नये?वाईट सवयी सोडा, म्हणजे खोटे बोलणे, दुसऱ्यांना धोका देणे, चोरी करणे किंवा इतरांना त्रास देणे यासारख्या वाईट सवयींपासून दूर राहावे. मांस, मद्य (दारू) आणि तंबाखू यांचे सेवन करू नये. शनिवार आणि मंगळवार या दिवशी लोखंडी वस्तू आणि चामड्याच्या वस्तूंची खरेदी करणे टाळावे.
advertisement
4/5
कोणत्याही असहाय किंवा गरीब व्यक्तीला चुकूनही त्रास देऊ नका, उलट त्यांना शक्य असल्यास मदत करा. ब्राह्मण, गुरुजन, मोठे-बुजुर्ग आणि आई-वडील यांचा कधीही अपमान करू नका वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडा. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा.
advertisement
5/5
साडेसाती प्रत्येकासाठी वाईटच असते असे नाही. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची स्थिती चांगली असते किंवा शनी ग्रह त्यांच्यासाठी योगकारक असतो, त्यांच्यासाठी साडेसातीचा काळ शुभ आणि लाभदायक देखील ठरू शकतो. अशा काळात लोकांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळते, प्रगती होते आणि त्यांचे आयुष्य शिस्तबद्ध होते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ShaniDev: अलर्ट राहण्याची वेळ आता या राशीवर! शनिच्या साडेसातीचा पुढचा नंबर कोणाचा? टेन्शन-त्रास मागे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल