TRENDING:

Astrology: संकटांचा काळ खूप सोसला! आता या राशींचा भाग्योदय; बुध-शनिची ग्रहस्थिती देणार शुभफळ

Last Updated:
Horoscope In Marathi : ओरॅकलची भविष्यवाणी वाचून मंत्रमुग्ध करणारा जादुई प्रवास सुरू करा. प्रत्येक राशीच्या व्यक्ती प्रेम, काम, आरोग्य आणि प्रवासातून हा अनुभव घेतील. मेष व्यक्ती उत्कटता दाखवतील, तर वृषभ व्यक्ती भावनिक खोली शोधतील. मिथुन व्यक्तींना काही अचानक काही नवी नाती गवसतील आणि कर्क व्यक्तींना दृढ होणाऱ्या नात्यांमध्ये आरामदायी वाटेल. सिंह व्यक्ती रोमँटिक क्षणांचा आनंद घेतील आणि कन्या व्यक्ती अचूकतेसह उत्कृष्ट कामगिरी करतील. तूळ व्यक्ती प्रेमळ सलोख्याचा अनुभव घेतील तर वृश्चिक व्यक्तींना काही बदलाचे अनुभव येतील. धनू व्यक्ती साहसाकडे प्रवास करतील तर मकर व्यक्ती नात्यांमध्ये मजबूत पाया तयार करतील. कुंभ व्यक्तींना अपारंपरिक प्रेमाचा अनुभव येईल आणि मीन व्यक्ती भावनिक सखोलता अनुभवतील. (25 सप्टेंबर 2024)
advertisement
1/12
संकटांचा काळ खूप सोसला! आता या राशींचा भाग्योदय; बुध-शनिची ग्रहस्थिती शुभ फळदायी
मेष (Aries) -मेष व्यक्तींसाठी आज प्रेमानं भारलेला दिवस असेल. तुमच्या रोमँटिक आयुष्यात उत्कटता जागवेल असं एखादं नवं किंवा अनपेक्षित नातं आज जोडलं जाईल. कामाच्या ठिकाणी विविध प्रकल्पांमध्ये तुम्ही अडकून जाल, पण लक्ष केंद्रीत केलं व नेटकेपणा ठेवला तर यश नक्की मिळवू शकाल. आरोग्याबाबत तुमची ताकद सांभाळण्यासाठी स्वतःची काळजी घेणं व आराम करणं याला प्राधान्य द्या. या दगदगीत स्वतःला सांभाळायचं असेल व संतुलन साधायचं असेल तर योगासनं किंवा मेडिटेशन करा. अचानक ठरलेली एखादी ट्रिप तुम्हाला सरप्राईज देईल.LUCKY Stone - AquamarineLUCKY Color – Royal BlueLUCKY Number - 7
advertisement
2/12
वृषभ (Taurus) -तुमच्या रोमँटिक आयुष्यात एखादं दृढ नातं जोडलं जाईल. तुमची भावनिक जवळीक वाढल्याचं तसंच बांधिलकीची भावना वाढल्याचं तुम्हाला जाणवेल. कामाच्या ठिकाणी आव्हानांवर मात केल्यामुळे तुमच्या संयम आणि चिकाटीचं फळ मिळेल. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करून तब्येतीला प्राधान्य द्या. बागकाम किंवा पेंटिंग अशा कलांमुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. निसर्गात फेरफटका किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देण्यासाठी प्रवास कराल.LUCKY Stone – Lapis LazuliLUCKY Color – Sky BlueLUCKY Number - 2
advertisement
3/12
मिथुन (Gemini) -मिथुन व्यक्तींच्या रोमँटिक जीवनात काही उत्साहवर्धक शक्यता निर्माण होतील. त्याकरता मन मोकळं ठेवा आणि काही अनपेक्षित गोष्टींसाठी तयार राहा. कामाच्या ठिकाणी आश्वासक परिस्थिती असेल. नव्या संधी किंवा भागिदारी होऊ शकतील. नित्यक्रमात व्यायामाचा व संतुलित आहाराचा समावेश करून तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. लिखाण किंवा वाचन तुम्हाला मानसिक शांतता व विचारांमध्ये स्पष्टता आणण्यास मदत करेल. प्रवासाचे काही छोटे प्लॅन्स किंवा नवीन शहर पाहायला जाण्याचे प्लॅन्स ठरू शकतात.LUCKY Stone – A Blue Lace AgateLUCKY Color - TurquioseLUCKY Number - 5
advertisement
4/12
कर्क (Cancer) -कर्क व्यक्तींच्या जीवनात प्रेम सलोखा व भावनिक परिपूर्णता राहील. असलेले नातेसंबंध दृढ होतील आणि काही नवीन नातीही जोडली जाऊ शकतात. ऑफिसात प्रगती करण्यासाठी तुमची कौशल्य विकसित करण्यावर आणि संधी शोधण्यावर भर द्या. भावनिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या. स्वयंपाक किंवा प्रियजनांसोबत वेळ घालवणं अशा गोष्टी तुम्हाला आनंद देतील. किनारी भागात फिरायला जाणं किंवा कुटुंबाबरोबर वेळ घालवणं असे काही प्रवासाचे बेत असतील.LUCKY Stone – MoonstoneLUCKY Color – Baby BlueLUCKY Number - 3
advertisement
5/12
सिंह (Leo) -सिंह व्यक्तींच्या आयुष्यात उत्साहवर्धक रोमँटिक काळ असणार आहे. तुमच्या लव्ह लाइफमध्ये नव्यानंच उत्कटता जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यातील सर्जनशीलता आणि नेतृत्व कौशल्य चमकतील आणि तुमची ओळख प्रस्थापित होईल. तसंच कामामध्ये बढतीही मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैली जपा व तुमच्या शरीराच्या गरजांकडे लक्ष देऊन तुम्ही तब्येतीला प्राधान्य देऊ शकता. नृत्य किंवा पेंटिंगच्या छंदात वेळ घालवून विश्रांती घेऊ शकता व मन रमवू शकता. प्रवासाच्या योजनांमध्ये काही व्हायब्रंट शहरांना भेटी देणं किंवा कार्यक्रमांना हजेरी लावणं यांचा समावेश करू शकता.LUCKY Stone – Blue TopazLUCKY Color – Navy BlueLUCKY Number - 1
advertisement
6/12
कन्या (Virgo) -कन्या व्यक्तींच्या आयुष्यात रोमँटिकदृष्ट्या स्थिरता आणि सलोख्याचा काळ असणार आहे. असलेले नातेसंबंध दृढ होतील आणि काही नवी नाती जोडली जातील. कामाच्या ठिकाणी बारीकसारीक तपशीलांकडे आणि नेटकेपणाकडे लक्ष द्या, त्यानंच तुम्हाला यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत, व्यायाम व ताण व्यवस्थापनाच्या कृतींचा नित्यक्रमात समावेश करून आरोग्याची काळजी घ्या. योगासनं व निसर्गातील फेरफटका याची समतोल साधायला व शांतता मिळवायला मदत होईल.LUCKY Stone - SapphireLUCKY Color – Pastel BlueLUCKY Number - 6
advertisement
7/12
तूळ (Libra) -ओरॅकलच्या भविष्यानुसार, तूळ व्यक्तींसाठी हा काळ रोमँटिकदृष्ट्या सलोखा व आनंदाचा आहे. असलेली नाती दृढ होतील व काही नवी नाती फुलतील. कामाच्या ठिकाणी, भागीदारी व सहयोग यांच्यामुळे यश मिळेल. स्वतःची काळजी व मनाला समाधान देणाऱ्या गोष्टी केल्यास मानसिक आरोग्य जपलं जाईल. त्यासाठी मेडिटेशन किंवा शांतता मिळवण्यासाठीची कला यांचा उपयोग होऊ शकतो. प्रवासाचे बेत ठरवताना आकर्षक शहरांना भेटी किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचा विचार कराल.LUCKY Stone – AzuriteLUCKY Color – Periwinkle BlueLUCKY Number - 4
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) -तुमच्या लव्ह लाइफमध्ये काही तीव्र तसंच परिवर्तनीय अनुभव येऊ शकतात. भावनांची खोली समजून घ्या आणि त्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचा यशाचा निर्धार आणि उत्कटता तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. संतुलित जीवनशैली व गरज असेल तेव्हा विश्रांती घेतल्यास आरोग्याला प्राधान्य देऊ शकाल. लिखाणासारख्या गोष्टी तुम्हाला विचारांमध्ये स्पष्टता व विश्रांती दोन्ही मिळवून देतील. काही गूढ ठिकाणांना भेटी देणं किंवा निसर्गात एकांत शोधणं असे प्रवासाचे बेत ठरू शकतात.LUCKY Stone – ObsidianLUCKY Color – Midnight BlueLUCKY Number -8
advertisement
9/12
धनू (Sagittarius) -धनू व्यक्तींना आज साहसी आणि उत्कट रोमँटिक अनुभव मिळेल. नव्या नात्यांचा स्वीकार करा आणि तुमच्या लव्ह लाइफमध्ये उत्साह आणा. कामाच्या ठिकाणी तुमचा आशावादी दृष्टिकोन व उत्साह यामुळे प्रगतीच्या संधी मिळतील. आरोग्य जपण्यासाठी शारीरिक व्यायाम व निरोगी जीवनशैली याला प्राधान्य द्या. आनंदी राहण्यासाठी हायकिंग किंवा नवीन छंद जोपासणे या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो. रोमांचक, साहसी ठिकाणांना भेट देण्याच्या किंवा परदेशातील ठिकाणांना भेट देण्याबाबत प्रवासाच्या योजना असू शकतात.LUCKY Stone – Blue TopazLUCKY Color – Electric BlueLUCKY Number - 9
advertisement
10/12
मकर (Capricorn) -मकर व्यक्तींसाठी स्थिर व सुरक्षित रोमँटिक काळ असेल. नात्यामध्ये मजबूत पाया उभारण्यावर भर द्या. कामाच्या ठिकाणी तुमची उद्दिष्ट साध्य करताना तुमचा शिस्तप्रिय दृष्टिकोन व मेहनत याचं फळ तुम्हाला मिळेल. संतुलित नित्यक्रम व आरामासाठी वेळ काढून आरोग्याची काळजी घ्या. बागकाम किंवा कृतज्ञता जपणाऱ्या कृती करून मनाची शांतता मिळवा. ऐतिहासिक ठिकाणी किंवा तुमच्या पूर्वजांचं वास्तव्य असणाऱ्या ठिकाणांना भेटी देण्याच्या योजना कराल.LUCKY Stone – Azurite or SapphireLUCKY Color – Steel BlueLUCKY Number - 10
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) -कुंभ व्यक्तींना उत्साहपूर्ण व अपारंपरिक रोमँटिक अनुभव येतील. समोरच्याचे वेगळे गुण व नवीन नात्यांचा स्वीकार करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या नावीन्यपूर्ण कल्पना व दृष्टी यामुळे यश मिळेल, तसंच तुमची ओळख प्रस्थापित होईल. व्यायाम व निरोगी सवयी यांचा नित्यक्रमात समावेश करून आरोग्य जपा. ग्रह-ताऱ्यांचं निरीक्षण व आरोग्यासाठीच्या काही सजग गोष्टी यातून मनाची शांतता मिळवा. पठडीबाहेरच्या ठिकाणांना भेट देण्याच्या किंवा बौद्धिक मेळाव्यांमध्ये सहभागी होण्याच्या योजना असू शकतात.LUCKY Stone – Aquamarine or Blue AventurineLUCKY Color – TurquoiseLUCKY Number – 11
advertisement
12/12
मीन (Pisces) -तीव्र भावनिक नाती व सखोल नातेसंबंध यांचा मीन व्यक्ती अनुभव घेतील. स्वतःच्या सहानुभूतीपूर्ण स्वभावाचा स्वीकार करा आणि प्रेमाच्या प्रवाहावर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमच्या अंतर्मनाची साद आणि कलात्मक कौशल्य चमकेल. त्यामुळे यश मिळेल. काम आणि आराम यांच्यात समतोल साधून आरोग्याला प्राधान्य द्या. पेंटिंग किंवा शांत संगीत ऐकल्यामुळे तुम्हाला आंतरिक शांतता लाभेल. प्रवासासाठी अध्यात्मिक ठिकाणं किंवा पाण्याजवळच्या ठिकाणांना भेट देण्याच्या काही योजना असू शकतात.LUCKY Stone – LarimLUCKY Color – Ocean BlueLUCKY Number - 12
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: संकटांचा काळ खूप सोसला! आता या राशींचा भाग्योदय; बुध-शनिची ग्रहस्थिती देणार शुभफळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल