TRENDING:

Weekly Horoscope: धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य; नवीन संधी मिळतील पण..

Last Updated:
Weekly Horoscope Marathi: ऑगस्टचा पहिला पूर्ण आठवडा काही राशींना विशेष लाभदायी ठरू शकतो. या आठवड्यात कोणताही मोठा ग्रह राशी बदलणार नाही. 4 ते 10 ऑगस्ट 2025 या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीत फारसे बदल होणार नाहीत. ग्रहांच्या सद्यस्थितीनुसार धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/5
धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य; नवीन संधी मिळतील पण..
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बुधादित्य राजयोग तयार होईल. सूर्य आणि बुध यांची सिंह राशीत युती झाल्यामुळे हा शुभ राजयोग तयार होत आहे. तसेच मिथुन राशीमध्ये गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. ४ ऑगस्ट २०२५ च्या सकाळी ७:०५ पर्यंत ब्रह्म योग राहील. १० ऑगस्ट २०२५ रोजी शोभन योग आहे.
advertisement
2/5
धनु - ऑगस्टचा पहिला आठवडा परदेश प्रवास किंवा परदेशाशी संबंधित कामात यश देण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता ठेवा. जवळच्या व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
advertisement
3/5
मकर - ऑगस्ट महिन्यातील हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक ठरू शकतो. अनावश्यक खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी तुमचे विचार मोकळेपणानं व्यक्त करा, तुमचे विचार कदाचित बदल घडवू शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा आता ठीक राहील.
advertisement
4/5
कुंभ - साडेसाती आता दिलासा देत असली तरी, या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांनी कौटुंबिक बाबींमध्ये लक्ष द्यावे लागेल. तुम्ही अनपेक्षित जुन्या मित्रांना भेटू शकता. तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल, परंतु वेळेचे व्यवस्थापन आवश्यक असणार आहे. काळजीपूर्वक वाहन चालवा.
advertisement
5/5
मीन - या आठवड्यात मीन राशीच्या लोकांची कल्पनाशक्ती फार चांगली असेल. कला, लेखन किंवा सर्जनशील कामात असलेल्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात आनंद राहील, परंतु मुलांच्या शिक्षणाबाबत काही चिंता वाढू शकतात. आर्थिक बाजू भक्कम असेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य; नवीन संधी मिळतील पण..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल