TRENDING:

तुम्हीही मंगळवारी घालता 'या' 4 रंगांचे कपडे? एक चुकीचा कलर वाढवेल अडचणी, काही राशींसाठी तर डोकेदुखीच!

Last Updated:
हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळवार हा दिवस मंगळ ग्रहाचा आणि हनुमानजींचा मानला जातो. मंगळ हा ग्रहांचा सेनापती असून तो साहस, ऊर्जा आणि अग्नीचे प्रतीक आहे. प्रत्येक दिवसाचे जसे काही शुभ रंग असतात, तसेच काही वर्ज्य रंगही असतात.
advertisement
1/7
तुम्हीही मंगळवारी घालता 'या' 4 रंगांचे कपडे? एक चुकीचा कलर वाढवेल अडचणी
हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळवार हा दिवस मंगळ ग्रहाचा आणि हनुमानजींचा मानला जातो. मंगळ हा ग्रहांचा सेनापती असून तो साहस, ऊर्जा आणि अग्नीचे प्रतीक आहे. प्रत्येक दिवसाचे जसे काही शुभ रंग असतात, तसेच काही वर्ज्य रंगही असतात.
advertisement
2/7
मंगळवारी चुकीच्या रंगाची निवड केल्याने मंगळ दोष वाढू शकतो आणि जीवनात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. विशेषतः काळा, तपकिरी आणि गडद पिवळा या रंगांचा मंगळवारी वापर करणे टाळावे, असे सल्ला ज्योतिषी देतात.
advertisement
3/7
काळा रंग : काळा रंग हा शनि ग्रहाशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि शनी यांचे शत्रुत्व मानले जाते. मंगळवारी काळा रंग परिधान केल्याने जीवनात नकारात्मकता येते आणि कामात अडथळे निर्माण होतात. यामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते.
advertisement
4/7
तपकिरी आणि राखाडी रंग : हे रंग राहू आणि केतू या छाया ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. मंगळाच्या ऊर्जेला हे रंग कमकुवत करतात. मंगळवारी तपकिरी कपडे घातल्याने आत्मविश्वासात घट होऊ शकते आणि घेतलेले निर्णय चुकू शकतात.
advertisement
5/7
गडद पिवळा रंग : पिवळा रंग गुरू ग्रहाचा आहे. मंगळवारी सौम्य पिवळा चालू शकतो, पण अतिशय गडद पिवळा रंग मंगळाच्या आक्रमकतेला अधिक उत्तेजित करू शकतो. यामुळे विनाकारण रागीट स्वभाव बनण्याची भीती असते.
advertisement
6/7
लाल रंग वापरावा की नाही?: येथे एक मोठा विरोधाभास आहे. लाल रंग मंगळाचाच आहे, परंतु ज्यांच्या कुंडलीत मंगळ अशुभ किंवा प्रबळ आहे, त्यांनी मंगळवारी लाल रंग टाळावा. अशा व्यक्तींसाठी लाल रंग आक्रमकता, अपघाताची भीती आणि रक्तदाब वाढवणारा ठरू शकतो.
advertisement
7/7
या राशींवर होतो नकारात्मक प्रभाव: विशेषतः मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी मंगळवारी हे वर्ज्य रंग वापरणे अत्यंत नुकसानदायक ठरू शकते. या राशींचा स्वामी बुध आहे, ज्याचे मंगळाशी वैर आहे. तसेच ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे, त्यांनी या रंगांपासून लांब राहावे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
तुम्हीही मंगळवारी घालता 'या' 4 रंगांचे कपडे? एक चुकीचा कलर वाढवेल अडचणी, काही राशींसाठी तर डोकेदुखीच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल