TRENDING:

अभिजीत मुहूर्तावर कॅटरीनाने ठेवलं लेकाचं नाव, आजच्या दिवसाचं विशेष महत्त्व; मिसेस कौशलने का निवडला आजचा दिवस?

Last Updated:
हिंदू पंचांगानुसार आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, आणि याच शुभ मुहूर्तावर बॉलीवूड अभिनेता आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाचं नामकरण केलं आहे.
advertisement
1/7
अभिजीत मुहूर्तावर ठेवलं लेकाचं नाव, मिसेस कौशलने का निवडला आजचा दिवस?
हिंदू पंचांगानुसार आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, आणि याच शुभ मुहूर्तावर बॉलीवूड अभिनेता आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाचं नामकरण केलं आहे.
advertisement
2/7
अभिजीत मुहूर्तावर कतरीना आणि विकीने त्यांच्या मुलाचं नाव ठेवलं आहे. अभिजीत मुहूर्त हा दिवसातील सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो आणि नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला असतो.
advertisement
3/7
कोणत्याही शुभ कार्य असो मग, लग्न, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तरी हा सर्वात शुभ मुहूर्त ठरतो म्हणून दिवसही खूप खास आहे. मानले जाते की, याच मुहूर्तावर भगवान राम यांचा जन्म झाला होता.
advertisement
4/7
याच मुहूर्ताला 'विजयी मुहूर्त' देखील म्हटले जाते. कारण या वेळेत केलेले कोणतेही कार्य पूर्ण होते आणि केलेल्या कोणत्याही कार्यात विजय मिळतो. आजच्या दिवशी काही शुभ योग जुळून येत आहेत, जे नाव ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जातात. विकी आणि कतरिना दोघेही अध्यात्माला मानणारे आहेत.
advertisement
5/7
आज 7 जानेवारी 2026 रोजी मंगळवार असून हिंदू पंचांगानुसार आज पौष कृष्ण पंचमी आहे. आजच्या दिवशी गणपती बाप्पाची विशेष कृपा मानली जाते. मंगळवार हा शुभ कार्यासाठी, विशेषतः नाव ठेवण्यासाठी शुभ मानला जातो. विकी-कतरिनाने आपल्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या 'मंगल' कार्यासाठी बाप्पाचा वार निवडल्याचे बोलले जात आहे.
advertisement
6/7
विकी-कतरिनाने त्यांच्या बाळाचं नाव विहान ठेवलं आहे. 'विहान' हे संस्कृत नाव असून त्याचा अर्थ 'पहाट', 'सूर्योदय' किंवा 'एका नव्या युगाची सुरुवात' असा होतो. नवीन वर्षाचा हा पहिलाच आठवडा असून, एका नव्या वर्षाच्या सुरुवातीला 'विहान' नाव जाहीर करणे हे त्यांच्यासाठी सकारात्मकतेचे प्रतीक आहे.
advertisement
7/7
कदाचित अनेकांना माहिती नसेल, पण विकी कौशलच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरलेल्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातील त्याच्या पात्राचे नाव 'मेजर विहान सिंह शेरगिल' असे होते. ज्या नावामुळे विकीला घराघरात ओळख मिळाली, तेच नाव त्याने आपल्या मुलाला देऊन एक प्रकारे त्या पात्राशी आणि यशाशी आपले भावनिक नाते जोडले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अभिजीत मुहूर्तावर कॅटरीनाने ठेवलं लेकाचं नाव, आजच्या दिवसाचं विशेष महत्त्व; मिसेस कौशलने का निवडला आजचा दिवस?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल