TRENDING:

Singh Rashifal 2026: सिंह राशीच्या लोकांना नवीन वर्षातील 3 महिने सगळ्यात खास; अनपेक्षित स्वप्न साकारणार, गुडन्यूज

Last Updated:
Singh Rashifal 2026: नवीन वर्ष सुरू झालं असून त्याकडून प्रत्येकाला जीवनात काही चांगलं होण्याची अपेक्षा आहे. ज्योतिषीय गणनेनुसार सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूपच छान दिसत आहे. पूर्ण वर्षभर शनिदेव सिंह राशीच्या आठव्या स्थानी विराजमान असतील. तर राहू तुमच्या सातव्या स्थानी असून 5 डिसेंबरला सहाव्या स्थानी येईल. 
advertisement
1/5
सिंह राशीच्या लोकांना नवीन वर्षातील 3 महिने सगळ्यात खास; अनपेक्षित स्वप्न साकार
नवीन वर्षात केतू सिंह राशीच्या लग्न भावात भ्रमण करेल. एकंदरीत ग्रहांची ही चाल सिंह राशीच्या लोकांसाठी फायद्याची दिसत आहे, त्यामुळे नवीन वर्षात सिंह राशीला कधी काय मिळेल, कोणत्या गोष्टी कशा जुळतील याचा अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
सिंह राशीच्या लोकांसाठी तीन महिने खास - वर्ष 2026 सिंह राशीच्या लोकांसाठी अनेक संधी आणि भरपूर यश घेऊन येत आहे. तसे तर हे पूर्ण वर्ष तुमच्यासाठी शानदार असेल, पण या वर्षातील तीन महिने विशेषतः तुमच्यासाठी लकी ठरतील. मार्च, एप्रिल आणि मे हे ते तीन महिने सिंह राशीला खास असतील.
advertisement
3/5
या तीन महिन्यांत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला जबरदस्त प्रगती पाहायला मिळेल. तुम्हाला हवी तशी नोकरी मिळू शकते, म्हणजेच मोठ्या कंपनीत चांगले पॅकेज मिळेल. तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेने तुमच्या वरिष्ठांना आणि इतर लोकांवर छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही स्वतःच्या हिमतीवर व्यावसायिक जगात स्वतःचे नाव कमवाल.
advertisement
4/5
गुरू ग्रहाची राहील विशेष कृपा - देवगुरु बृहस्पतीचे तुमच्या अकराव्या स्थानी होणारे भ्रमण तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घडवून आणेल. या वर्षी तुमच्या व्यवसायात मोठा बदल होईल. जर तुम्ही भागीदारीमध्ये काही नवीन करण्याचा विचार करत असाल, तर 2026 तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल, तर या वर्षी तुम्हाला ते सहज मिळेल.
advertisement
5/5
ऑनलाइन ट्युशन किंवा कोचिंगशी संबंधित कामांमध्ये चांगले यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. तुम्ही उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकता. वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानक मोठे यश किंवा संधी प्राप्त होतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Singh Rashifal 2026: सिंह राशीच्या लोकांना नवीन वर्षातील 3 महिने सगळ्यात खास; अनपेक्षित स्वप्न साकारणार, गुडन्यूज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल