TRENDING:

BMW ची 5 स्टार सेफ्टी रेटिंगची SUV, 180 किमी स्पीड अन् डंपरला धडकली ; कारचा फक्त सांगाडा उरला, PHOTOS

Last Updated:
सेफ्टी रेटिंग ५ स्टार असेल तर निर्धास्त असतो. त्यातही जर चांगल्या ब्रँडची कार असेल तर बघायचं काम नाही. पण नुसतं सेफ्टी रेटिंग चांगलं असून याचा उपयोग नाही.
advertisement
1/8
BMW ची 5 स्टार सेफ्टी रेटिंगची SUV, 180 किमी स्पीड अन् डंपरला धडकली PHOTOS
कार घेताना नेहमी सेफ्टी रेटिंग किती आहे, याचा विचार केला जातो. सेफ्टी रेटिंग ५ स्टार असेल तर निर्धास्त असतो. त्यातही जर चांगल्या ब्रँडची कार असेल तर बघायचं काम नाही. पण नुसतं सेफ्टी रेटिंग चांगलं असून याचा उपयोग नाही. याचं एक उदाहरण नवी मुंबईतून समोर आलं आहे. BMW सारख्या कंपनीचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा पुर्ण चुराडा झाला असून फक्त चेसी उरली आहे. या अपघातात २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
advertisement
2/8
नवी मुंबईतील अटल सेतूवर शुक्रवारी पहाटे 2.30 वाजता अपघात झाला. पुनित सिंह माजरा (वय २८ ) असं मृत तरुणाचं नाव आहे. पुनित माजरा हा चेंबूर इथं राहणार होता. त्याचे वडील हे रिअल इस्टेट व्यवसायात होते. त्यांनी लेकाला BMW x1 ही आलिशान SUV घेऊन दिली होती.
advertisement
3/8
बीएमडब्ल्यू X1 ही अलीकडेच लाँच झालेली एसयुव्ही आहे. या एसयूव्हीमध्ये 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे134-136 hp पॉवर, 230 Nm टॉर्क) जनरेट करतो. 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला आहे. तर डिझेल इंजिन हे 2.0-लिटर टर्बो डिझेल 147-150 पॉवर hp, 360 Nm इतका टॉर्क जनरेट करतो. 7 किंवा 8-स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला आहे. ही एसयूव्ही ० ते १०० किमी वेग फक्त ८.९ सेकंदात गाठतो. या एसयूव्हीचा टॉप स्पीड हा २१९ किमी प्रतितास इतका आहे.
advertisement
4/8
पुनित माजरा हा पहाटे 2.30 वाजता अटल सेतूच्या उत्तरेकडील लेनवर पनवेलकडे जात होता. पहाटेच्या वेळी रस्ता मोकळा असल्यामुळे तब्बल १६० ते १८० किमी स्पीडने कार चालवत होता. अचानक समोर एक डंपर आला आणि पुनितचं कारवरून नियंत्रण सुटलं. त्यानंतर कारही डंपरला धडकली. ही धडक इतकी भीषण होती, BMW X1 चा चुराडा झाला. डंपरने काही अंतर तिला फरफटत नेलं.
advertisement
5/8
एवढंच नाहीतर अटल सेतूवर असलेल्या बाजूच्या डिव्हायडरला काही अंतर घासत गेल्याचं दिसतं आहे. सेतूवर लावण्यात आलेल्या साईटची ग्रील सुद्धा तुटली. BMW X1 ही ५ स्टार रेटिंग कार आहे. असं म्हटलं जात की, अपघातात BMW कार कधी पलटी होत नाही, जरी अशी वेळ आली तर आतमधील चालक हा सुरक्षित राहत असतो. पण कारचा वेग इतका होता की, पुनित वाचू शकला नाही.
advertisement
6/8
पुनितचा मृतदेह हा पुढच्या सीटवरून उडून मागच्या सीटवर जाऊन पडला होता. कारचा चेंदामेंदा झाल्यामुळे पाठीमागून कार कापून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त गाडीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी महामार्गावर तैनात असलेल्या जलद प्रतिसाद पथकाची मदत घेतली.
advertisement
7/8
पुनित इतक्या वेगात का कार चालवत होता, याचं कारण अजून कळलं नाही. तो दारू प्यायलेला होता का, याची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी केली जात आहे.
advertisement
8/8
कारची धडक वेगाने झाल्याने डंपरचेही नुकसान झालंय. अपघातग्रस्त BMW X1 कामोठे पोलीस स्टेशनला तपासणीसाठी नेण्यात आली आहे. या अपघातात कार जरी कितीही सेफ असली तर वेगावर नियंत्रण ठेवणं तितकं गरजेचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
BMW ची 5 स्टार सेफ्टी रेटिंगची SUV, 180 किमी स्पीड अन् डंपरला धडकली ; कारचा फक्त सांगाडा उरला, PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल