Tata Altroz 6.89 लाखांत झाली लॉन्च! डिझेलसह मिळेल CNG ऑप्शन
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
New Tata Altroz: टाटा मोटर्सची नवीन अल्ट्रोज आज भारतात लाँच झाली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.89 लाख रुपयांपासून सुरू होते. त्यात 5 कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. या कारमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच AMT गिअरबॉक्सची सुविधा मिळेल....
advertisement
1/7

All New Tata Altroz: टाटा मोटर्सने आज भारतात त्यांची नवीन अल्ट्रोज फेसलिफ्ट लाँच केली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.89 लाख ते 11.29 लाख रुपयांपर्यंत आहे. यावेळीही नवीन अल्ट्रोज पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी ऑप्शनसह सादर करण्यात आली आहे.
advertisement
2/7
ही कार 5 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये ड्यून ग्लो, एम्बर ग्लो, रॉयल ब्लू, प्युअर ग्रे आणि पांढरा रंग समाविष्ट आहे. कंपनीच्या मते, सर्व रंग ग्राहकांना आवडतील. या कारमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच एएमटी गिअरबॉक्सची सुविधा मिळेल. यावेळी या कारमध्ये काही खास आणि नवीन दिसेल का ते पाहूया.
advertisement
3/7
नवीन Altroz 1.2L पेट्रोल आणि 15L डिझेल इंजिनसह लाँच करण्यात आली आहे. याशिवाय, त्यात सीएनजीचा ऑप्शन देखील उपलब्ध आहे. मॅन्युअल, एएमटी आणि डीसीए गिअरबॉक्स ऑप्शन उपलब्ध आहेत.
advertisement
4/7
ही कार थेट सीएनजी मोडवर देखील सुरू होऊ शकते. या कारमधील दोन्ही इंजिन विश्वसनीय आहेत. कंपनीचा दावा आहे की, हे सर्व हवामानात उत्कृष्ट कामगिरी करतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही समस्येशिवाय कामगिरी करत आहेत.
advertisement
5/7
स्पेस आणि फीचर्स : नवीन अल्ट्रोजमध्ये सेगमेंटमधील सर्वोत्तम बूट स्पेस 345 लिटर असेल. त्याशिवाय सीएनजी मॉडेलमध्ये 210 लिटरची बूट स्पेस असेल. जागा खूप चांगली आहे आणि तुम्ही इथे खूप काही ठेवू शकता.
advertisement
6/7
याशिवाय गाडीत 5 जणांसाठी बसण्याची जागा देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, नवीन मॉडेल बेस्ट इन क्लास थाय सपोर्ट आणि हेडरूम प्रदान करेल. याशिवाय, मागच्या प्रवाशांसाठी रियर एसी व्हेंटसह जलद चार्जिंगची सुविधा देखील उपलब्ध असेल.
advertisement
7/7
इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, सेफ्टीसाठी, कारमध्ये 6 एअरबॅग्ज, ESP, सनरूफ, 3 पॉइंट सीट बेल्ट, फ्लश डोअर हँडल, ऑल डोअर पॉवर विंडो, 16 इंच टायर्स, एलईडी टेल लॅम्प, स्मार्ट डिजिटल स्टीअरिंग व्हील, प्रोजेक्टर हेडलॅम्प, पुश स्टार्ट बटण आणि पूर्णपणे नवीन इंटीरियर असेल. यावेळी नवीन अल्ट्रोज पूर्वीपेक्षा खूपच चांगले झाले आहे.