TRENDING:

Scooter: बायको आणि लेकीसाठी 5 बेस्ट स्कुटर, ना लायसन्सची गरज ना पेट्रोलचं टेन्शन, किंमतही कमी!

Last Updated:
खास करून महिलांसाठी या स्कुटर सगळ्यात जास्त फायदेशीर ठरत आहे. ५ अशा स्कुटर आहे, ज्या तुम्ही तुमच्या बायकोसाठी किंवा लेकीसाठी नक्की खरेदी करू शकतात.
advertisement
1/6
बायको आणि लेकीसाठी 5 बेस्ट स्कुटर,ना लायसन्सची गरज ना पेट्रोलचं टेन्शन, किंमत...
भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री चांगलीच वाढली आहे. मध्यमवर्गीय कुटुंब सध्या ईव्ही स्कुटरला जास्त पसंती देत आहे. रोजच्या वापरासाठी स्कुटरही सगळ्यात बेस्ट असा ऑप्शन ठरत आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी पेट्रोल भरण्याची गरज पडत नाही. सध्या मार्केटमध्ये एकापेक्षा एक अशा ईव्ही स्कुटर मार्केटमध्ये आहे. खास करून महिलांसाठी या स्कुटर सगळ्यात जास्त फायदेशीर ठरत आहे. ५ अशा स्कुटर आहे, ज्या तुम्ही तुमच्या बायकोसाठी किंवा लेकीसाठी नक्की खरेदी करू शकतात.
advertisement
2/6
Zelio Little Gracy Zelio च्या  या स्कुटरचं डिझाइन एकदम हटके असंच आहे. या स्कुटरचं वजनही कमी आहे. फक्त  80 किलोग्राम वजन असलेली ही  इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी Driving Licence ची गरजही लागत नाही. एकदा चार्ज केल्यावर 60 ते 90 किमी आरामात प्रवास करू शकतात. या स्कुटरचा टॉप स्पीड हा 25 किमी/तास इतरा आहे. या स्कुटरची किंमत 49,500 रुपये इतकी आहे. 
advertisement
3/6
Ola S1 Z : ओलाने याआधीच मार्केटमध्ये स्कुटर आणून धमाका उडवला होता. पण आता पहिल्या मॉडेलचं सुधारित मॉडेल लाँच केलं आहे.  ओलाच्या  या स्कुटरचं वजन 110 किलोग्राम इतकं आहे. या  स्कुटरमध्ये 1.5 kWh च्या २ बॅटरी दिल्या आहेत. जे 75 ते 146 किमी इतकी रेंज देते. 110 किलो वजन असलेल्या या स्कुटरचा टॉप स्पीड हा 70 किमी तास इतका आहे.  रोजच्या वापरासाठी ही स्कुटर बेस्ट ऑप्शन ठरत आहे. या स्कुटरची किंमत  59,999 रुपये आहे. 
advertisement
4/6
TVS iQube : इलेक्ट्रिक २.२kWh बॅटरी असलेल्या TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ८९,९९९ रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ७५ किमी चालते. तर ०-८०% चार्जिंग वेळ २ तास ४५ मिनिटे आहे. ही स्कुटरसाठी तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे - पर्ल व्हाइट, वॉलनट ब्राउन आणि टायटॅनियम ग्रे ग्लॉसी.
advertisement
5/6
Bajaj Chetak : बजाज चेतकची सुरुवातीची किंमत 98,498 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या स्कुटरमध्ये २.९ किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे, जी ०-८०% पर्यंत चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात. या स्कुटरचा टॉप स्पीड ताशी ६३ किमी आहे तर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर रेंज १२३ किमी आहे असा दावा कंपनीने केला आहे. यात हिल होल्ड, सिक्वेंशियल ब्लिंकर्स, अॅप कनेक्टिव्हिटी आणि मल्टिपल राइड मोड्स (इको आणि स्पोर्ट) सारखे फिचर्स आहेत.
advertisement
6/6
Ather 450X - अथर हा एक विश्वसनिय ब्रँड आहे.  या  स्कूटरचं वजन 108 किलोग्राम इतक आहे. या स्कूटरमध्ये 2.9 Kwh ची बॅटरी पॅक दिला आहे.  फुल चार्ज केल्यावर ही स्कुटर 126 किलोमीटर इतकी रेंज देते.  108 किलोग्राम वॅट असलेल्या स्कुटरचा टॉप स्पीड 90kmph इतका आहे. या स्कुटरची बॅटरी फक्त  3 तासांमध्या चार्ज होते. या स्कुटरची किंमत 1.49 लाख इतकी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Scooter: बायको आणि लेकीसाठी 5 बेस्ट स्कुटर, ना लायसन्सची गरज ना पेट्रोलचं टेन्शन, किंमतही कमी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल