TRENDING:

58 व्या वर्षी अरबाज झाला बाबा! EX बायको मलायकानं असं विश केलं की चर्चेत आली पोस्ट

Last Updated:
Malaika Arora : अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराने शुभेच्छा देत एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
1/7
58 व्या वर्षी अरबाज झाला बाबा! EX बायको मलायकानं असं विश केलं; पोस्ट चर्चेत
अभिनेत्री मलायका अरोराचा पूर्व पती आणि अभिनेता अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. अरबाजची दुसरी पत्नी शुरा खानने एका गोड मुलीला जन्म दिलाय. त्यानंतर मलायका अरोराची एक पोस्ट चर्चेत आली आहे.
advertisement
2/7
अरबाज खान आणि शुरा यांच्या आयुष्यात 5 ऑक्टोबर रोजी एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. खान कुटुंबियांना बाळाचं जोरदार स्वागत केलंय. तर दुसरीकडे मात्र मलायका अरोराची पोस्ट चर्चेत आली आहे.
advertisement
3/7
अरबाजचं पहिलं लग्न मलायका अरोरासोबत झालं होतं. त्यानंतर 2017 मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर 2023 मध्ये अरबाजने शुरासोबत निकाह केला.
advertisement
4/7
आता लग्नाच्या दोन वर्षांत अरबाज-शुराने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. शुराच्या लेकीच्या जन्मानंतर चारच दिवसांत मलायकाने आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये तीन रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. त्यामुळे मलायकाने आपल्या हटके स्टाईलमध्ये अरबाज आणि शुराला शुभेच्छा दिल्या असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
5/7
मलायकाने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये चाहत्यांना नेहमी हसत राहण्याचाही सल्ला दिलाय. "नेहमी हसण्यासाठी कारण शोधा', असं तिने लिहिलं आहे.
advertisement
6/7
मलायकाने याआधीही खऱ्या प्रेमाबद्दल भाष्य केलं होतं. 'इंडिया गॉट टॅलेंट' या कार्यक्रमात नवजोत सिंह मलायकला म्हणतो,"सच्चे प्यार में कोई सौदेबाजी नहीं होती". त्यावर मलायका म्हणते,"पाजी मला हे लिहून घ्यायचं आहे की खऱ्या प्रेमात काही होत नाही".
advertisement
7/7
अरबाज आणि शुरा खानने आपल्या लेकीचं नाव ‘सिपारा खान’ असं ठेवलं आहे. सध्या सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
58 व्या वर्षी अरबाज झाला बाबा! EX बायको मलायकानं असं विश केलं की चर्चेत आली पोस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल