TRENDING:

Cars: एक पाण्याची बाटली अन् चष्मा तुमची कार जळून करू शकते कोळसा!

Last Updated:
उन्हाळ्यामध्ये सगळ्या जास्त कारला आग लागल्याच्या घटना घडत असतात. अशातच जर तुमच्याकडे जर कार असेल तर  तुम्ही सतर्क राहिले पाहिजे.
advertisement
1/9
Cars: एक पाण्याची बाटली अन् चष्मा तुमची कार जळून करू शकते कोळसा!
सध्या एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकायला लागला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. उन्हाळ्यामध्ये सगळ्या जास्त कारला आग लागल्याच्या घटना घडत असतात. अशातच जर तुमच्याकडे जर कार असेल तर  तुम्ही सतर्क राहिले पाहिजे. उन्हाळ्यात कारला आग लागण्याचा धोका जास्त असतो. गाडीत काही वस्तू ठेवणे धोकादायक असू शकते आणि त्यामुळे आगीचा धोका वाढू शकतो. पाण्याच्या बाटल्या, परफ्यूम आणि इतर ज्वलनशील पदार्थामुळे कारमध्ये आग लागू शकते. 
advertisement
2/9
पाण्याच्या बाटल्या आणि ग्लास दोन्ही पाण्याच्या बाटल्या आणि ग्लास सूर्यप्रकाश केंद्रित करतात आणि उष्णता निर्माण करतात, ज्यामुळे आगीचा धोका वाढतो.
advertisement
3/9
परफ्यूम आणि सॅनिटायझर्स सारखे पदार्थ जर कारमध्ये ठेवत असाल तर त्यामध्ये अल्कोहोल असते, ज्यामुळे आग लागू शकते.
advertisement
4/9
इतर ज्वलनशील पदार्थ, जसे की लाईटर, मेणबत्त्या किंवा रसायने, देखील आग लावू शकतात, त्यामुळे कारमध्ये ठेवू नका. 
advertisement
5/9
जर तुम्ही गाडीत हॉर्न मॉडिफिकेशन करत असाल, तर फ्यूज कॅपेसिटी बॉक्स व्यवस्थित आहे की नाही ते तपासा. 
advertisement
6/9
इंजिन जास्त गरम होत असेल असं जाणवत असेल तर कूलेंट लिक किंवा बिघाडामुळे इंजिनचे तापमान वाढू शकतं, ज्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो.
advertisement
7/9
उन्हात पार्क केलेल्या गाडीत पाण्याची बाटली ठेवू नका. परफ्यूम आणि सॅनिटायझर काढून टाका.  गाडीत परफ्यूम आणि सॅनिटायझर ठेवू नका.
advertisement
8/9
गाडीत इतर ज्वलनशील पदार्थ ठेवू नका. इंजिनचे तापमान वाढले की, गाडी बंद करा आणि थंड होऊ द्या.
advertisement
9/9
कारमध्ये धूर निघत असेल असं जाणवलं तर कारमधून लगेच बाहेर पडा, पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कॉल करा. जर तुमच्याकडे आगरोधक असेल तर त्याचा वापर करावा. या खबरदारीचे पालन करून, तुम्ही तुमच्या कारला आगीच्या धोक्यापासून वाचवू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Cars: एक पाण्याची बाटली अन् चष्मा तुमची कार जळून करू शकते कोळसा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल