Akshaya Tritiya च्या मुहुर्तावर दारात उभी करा Royal Enfield Classic 350, एकदा EMI चेक कराच!
- Published by:sachin Salve
Last Updated:
जर तुम्ही एखादी दमदारी बाइक खरेदी करण्यासाठी प्लॅन करत असाल रॉयल एनफील्डने तुम्हाला चांगली संधी दिली आहे.
advertisement
1/6

अक्षयतृतीयाच्या मुहुर्तावर बाइक खरेदी करण्यासाठी अनेक जण पसंत करत असतात. अशातच जर तुम्ही एखादी दमदारी बाइक खरेदी करण्यासाठी प्लॅन करत असाल रॉयल एनफील्डने तुम्हाला चांगली संधी दिली आहे. Royal Enfield Classic 350 ने अनेक वर्षांपासून मार्केटमध्ये आपला दबदबा कायम राखला आहे. सर्वाधिक विक्री होणारी ही बुलेट ठरली आहे. अशातच अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर रॉयल एनफील्ड 350 फक्त ६ हजारांच्या EMI वर ही बुलेट तुम्हाला दारात उभी करताय येईल.
advertisement
2/6
रॉयल एनफील्डची Classic 350 ही सगळ्यात जास्त विक्री होणारी बुलेट आहे. नुसतं नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर Classic 350 बुलेट उभी राहते. या बुलेटची ऑन रोड किंमत २ लाख रुपये आहे. पण तरीही या बाइकच्या विक्रीमध्ये कधीही घट झाली नाही. जर तुम्हाला Classic 350 विकत घ्यायची असेल तर सध्या कंपनीने खास ऑफर दिली आहे.
advertisement
3/6
रॉयल एनफील्ड Classic 350 चे पाच व्हेरियंट्स भारतीय बाजारामध्ये उपलब्ध आहे. क्लासिक 350 चं सर्वात स्वस्त मॉडेल हे हेरिटेज व्हर्जन आहे. या बुलेटची दिल्लीत ऑन-रोड किंमत 2,28,526 रुपये आहे. देशातील इतर राज्यांमध्येही जवळपास एवढीच किंमत येतेय. काही राज्यांमध्ये ऑन रोड किंमतही परिवहन धोरणानुसार कमी जास्त असू शकते. ही बाइक विकत घेण्यासाठी तुम्हाला 2,17,100 रुपयांचं लोन मिळू शकतं. तुमचा क्रेडिट स्कोअर किती आहे, यावर सुद्धा लोनची रक्कम ठरू शकते.
advertisement
4/6
रॉयल एनफील्ड Classic 350 विकत घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 11,500 रुपये डाउन पेमेंट करावा लागेल. बाइक लोनवर बँक 9 टक्के व्याज आकारू शकते. जर तुम्ही दोन वर्षांसाठी लोन घेतलं तर प्रत्येक महिन्याला 10,675 रुपये इतका EMI येऊ शकतो. या शिवाय Classic 350 साठी जर तुम्ही ३ वर्षांसाठी लोन घेतलं तर 9 टक्के व्याजाने दर महिना 7,650 रुपये इतका EMI येऊ शकतो.
advertisement
5/6
दर महिन्याला किती द्यायचा EMI? - रॉयल एनफील्ड Classic 350 बाइक खरेदी करण्यासाठी जर तुम्ही बँकेकडून ४ वर्षांसाठी लोन घेतलं तर EMI आणखी कमी होईल. 48 महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला 6,150 रुपये इतका EMI जमा करावा लागेल.
advertisement
6/6
पण प्रत्येक बँक ही आपल्या नियमांनुसार लोनच्या व्याजामध्ये कमी जास्त रक्कम दिसू शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, लोन घेण्याआधी सर्व कागदपत्र नीट वाचून घेणे अत्यंत गरजेचं असतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Akshaya Tritiya च्या मुहुर्तावर दारात उभी करा Royal Enfield Classic 350, एकदा EMI चेक कराच!